रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. हळदीच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने चार टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.१ टक्क्यांनी अधिक आहेत.
देशाच्या काही भागात अजूनही पाऊस सुरू आहे. सणांमध्ये खरिप पिकांची मागणी वाढत आहे, पण त्या प्रमाणात आवक वाढत नाही. त्यामुळे या सप्ताहात बहुतेक सर्व पिकांचे भाव वाढले (आलेख १). पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अजून अंदाज येत नसल्यामुळे, जानेवारी २०२० च्या किमतींमध्ये सुद्धा वाढ दिसत आहे. (आलेख २). नोव्हेंबरच्या सुरवातीस खरीप पिकांची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम किमतींवर दिसेल अशी शक्यता आहे. २३ ऑक्टोबर रोजी रब्बी पिकांचे हमी भाव जाहीर झाले. वर्ष २०१९-२० साठी गव्हाचे भाव प्रती क्विंटल रु. १,९२५ व हरभऱ्याचे रु. ४,८७५ असतील.
गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार ः
मका (रब्बी)
रब्बी मक्याच्या (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात १३ तारखेपर्यंत उतरत होत्या (रु. २,१८७ ते रु. २,०८९). त्यानंतर वाढत गेल्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी घसरून रु. २,१२१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,११३ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. डिसेंबर डिलिवरीचे भाव रु. २,१३१ आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. डिसेंबरमधील भाव (रु. २,०७०) हमी भावापेक्षा अधिक आहेत. या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे.
हळद
हळदीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबरमध्ये उतरत होत्या. (रु. ६,९३८ ते रु. ६,१४०). या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी वाढून रु. ६,१०६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,१२७ वर आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,३७०). या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित आहे.
गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबर महिन्यातसुद्धा घसरत होत्या (रु. ४,२१२ ते रु. ३,९८३). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेत १.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,००० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किंमती रु. ३,९७५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जानेवारी मधील फ्युचर्स किंमती ३.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,११३). या वर्षी राजस्थानमध्ये चांगला पाऊस झाला आहे. नोव्हेंबरमध्ये किंमती घसरण्याचा संभव आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,०२५ ते रु. ४,३८६). गेल्या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,४९८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या मागणी कमी झाल्यामुळे १.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,४१४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३९२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जानेवारी मधील फ्युचर्स किमती १.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४६३). शासनाकडे पुरेसा साठा आहे.
सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,४८६ ते रु. ३,८२१). गेल्या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,७१७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,७६४ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,८३७ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. चीन व अमेरिकेमधील संबंध अजूनही सुधारलेले नाहीत. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. जानेवारी डिलिवरीसाठी रु. ३,८३३ भाव आहे. नंतरच्या महिन्यांसाठी (फेब्रुवारी व मार्च २०२० डिलिवरीसाठी) तो अनुक्रमे रु. ३,८८९ व रु. ३,९४५ आहे.
मूग
मुगाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात १८ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ६,२७८ ते ५,९९३). त्यानंतर त्या वाढू लागल्या. या सप्ताहात
त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ६,४७२ वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,४५० वर आल्या आहेत. नवीन मूग या महिन्यात बाजारात येऊ लागला आहे; पण अजून तो पुरेसा नाही. जानेवारीच्या फ्युचर्स किमती रु. ६,५३३ वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत. आवक वाढेल तेव्हा भाव घसरण्याची शक्यता आहे.
गहू
गव्हाच्या (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात रु. २,०७५ व रु. २,१३३ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २,१५१ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोटा) किंमती रु. २,०८८ वर आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किंमतींपेक्षा ६.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२१४).
कापूस
एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबरमध्ये रु. १९,०७० व रु. १९,५०० च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने वाढून रु. १९,४५० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,९६१ वर आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती रु. १९,५५० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बासमती तांदूळ
बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती १५.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,३०० वर आल्या आहेत.
(टीप ः सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १७० किलोची गाठी).
इमेल - arun.cqr@gmail.com

0 comments:
Post a Comment