जळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच होती. यामुळे दरात सुधारणा सुरूच राहिली. जळगाव, चोपडा भागात कांदेबाग केळीला प्रतिक्विंटल १५९० रुपये दर मिळाला. क्विंटलमागे ४० रुपयांची सुधारणा मागील १२ ते १३ दिवसांत झाली आहे.
केळीची आवक चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत रोडावली आहे. उतिसंवर्धित केळी बागांमधील काढणी आठवडाभरात वेगात झाली. यामुळे केळी बागा लवकर रिकाम्या झाल्या. पारंपरिक वाणांच्या केळी बागांमधील काढणी सुरू आहे. परंतु चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत या बागा कमी आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागांत केळीची उपलब्धता अजूनही हवी तशी नाही. मध्य रावेरातील धामोडी, ऐनपूर आणि सातपुडा पर्वतालगतच्या केऱ्हाळे, पिंप्री, चिनावल आदी भागांतही केळी फारशी काढणीवर नाही.
मध्यंतरी दुर्गोत्सवामुळे उत्तर भारतातून मागणी होती. अलीकडे थंडीची चाहूल लागताच केळीची मागणी टिकून राहिली. जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर भागात मिळून प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक झाली. तर मुक्ताईनगर, यावल, रावेर या भागांत प्रतिदिन १४० ट्रक केळीची आवक झाली. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारातही केळीची आवक प्रतिदिन २२० ट्रकपर्यंत राहिली. तेथेही हवी तेवढी आवक नसल्याने दर टिकून आहेत.
फरकासह जळगाव, चोपडा भागातील केळीला १६०० रुपयांवर दर मिळाले. जळगाव जिल्ह्यातून राज्यात कल्याण, ठाणे या भागातही केळीची पाठवणूक झाली. तर नागपूर, छत्तीसगड, राजस्थान या भागातही कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक झाली. सावदा (ता. रावेर) व फैजपूर (ता. यावल), चोपडा येथील केळीच्या एजंटकडून उत्तर भारतात दर्जेदार केळीची बॉक्समध्ये पॅकिंग करून पाठवणूक झाली. दर महिनाभरापासून टिकून असून, पुढे आवक रोडावण्याचे संकेत आहेत. दर्जेदार केळीचा तुटवडा पुढे जाणवू शकतो, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.

0 comments:
Post a Comment