पिठ्या ढेकूण (इंग्रजी नाव - मिलीबग) ही कीड झाडाच्या सालीच्या खाली, फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत राहते. चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थाच्या आवरणामध्ये घालते. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही मेणचट पांढुरक्या रंगांचे आवरण असते. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी अंड्यापर्यंत किंवा किडीच्या शरीरापर्यंत पोहचू शकत नाही.
किडीची ओळख आणि जीवनक्रम
प्रौढ : मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असून रंग पांढरट लालसर असतो. डोके, वक्षस्थळ आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात.
अंडी : मादी सैलसर कापसासारख्या पुंजक्यात जवळपास ६०० अंडी घालते, त्याला ‘अंडी थैली’ असे म्हणतात. अंड्याच्या थैल्या वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती दिसून येतात. अंडी अंडाकृती, नारंगी रंगांची असतात.
पिले : अंड्यातून संथपणे सरपटणारी नारंगी व विटकरी लाल रंगाची पिले बाहेर पडतात. पूर्ण झाडावर झाडावर पसरतात. पिले फळे व कोवळ्या फांद्यांवर थांबतात. या अवस्थेत किडीवर पांढऱ्या रंगाचा मेणचट पदार्थ नसतो, त्यामुळे कीटकनाशकांचा योग्य परिणाम होतो. या किडीची एक पिढी सरासरी ३० दिवसात पूर्ण होते. एका वर्षात जवळजवळ १२ ते १५ पिढ्या पूर्ण होतात.
नुकसानीचा प्रकार :
या किडीची पिले प्रौढ पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषण करतात. परिणामी पानांचा, फळांचा आकार वेडावाकडा होतो, त्यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो. ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्रवते. त्यावर काळी बुरशी वाढून पाने व फळे काळी पडतात. फळांना बाजारभाव मिळत नाही.
एकात्मिक कीड व्यवस्थापन :
- जमिनीची खोलवर नांगरट करावी. जमीन उन्हात चांगली तापू द्यावी. जमिनीत असणाऱ्या किडींच्या अवस्था नष्ट होतात.
- पिठ्या ढेकूण झाडावर चढू नये यासाठी १५ ते २० सें.मी. रुंदीची प्लास्टिक पट्टी ग्रीस लावून खोडावर बांधावी. पिठ्या ढेकूण या चिकट पट्ट्यांना चिकटून मरतात.
- बाग व बागेभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- बागेशेजारी भेंडी, कपाशी ही पिके घेऊ नयेत, कारण या पिकांवर पिठ्या ढेकूण ही कीड मोठ्या प्रमाणावर वाढते.
- परभक्षी मित्रकीटक क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी प्रति एकरी ६०० या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळी सोडावेत. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाची बागेमध्ये फवारणी करू नये.
- आर्द्रतायुक्त हवामान असल्यास व्हर्टीसिलियम लेकॅनी हे जैविक बुरशीनाशक ४ ग्रॅम अधिक फिशऑईल रोझीन सोप ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
- अगदीच आवश्यकता भासल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
- क्लोरपायरीफॉस २.५ मि.ली. किंवा
- बुप्रोफेझीन (२५ एस.सी.) २ मि.ली.
टीप ः वरील कीटकनाशकांमध्ये फिश ऑइल रोझीन सोप २.५ मि.ली. प्रति लिटर प्रमाणे मिसळावे.
डॉ. धीरजकुमार कदम (सहयोगी प्राध्यापक), ९४२१६२१९१०
विलास खराडे (पीएच.डी. स्कॉलर), ९४२१५९६१७९
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

0 comments:
Post a Comment