सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांना मागणी वाढली. त्यांची आवक ही जेमतेम राहिली. पण, त्यांचे दर चांगलेच वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबिरीची आवक प्रतिदिन १० हजार पेंढ्या, मेथीची ५ हजार पेंढ्या आणि शेपूची ३ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. एक-दोन दिवसाआड आवकेत चढ-उतार होत राहिला. पण, भाज्यांना मागणी वाढल्याने दर तेजीत राहिले. सध्या अनेक भागांत पाऊस सुरू आहे. काही भागांत पाऊसच नाही. त्यामुळे मागणीच्या प्रमाणात आवक नाही. त्याचा परिणाम दरावर होतो आहे. भाज्यांची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने कमीच राहिली.
कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी किमान ३०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये, मेथीला किमान ४०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि १००० रुपये, तर शेपूला किमान ३०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ७०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, वांगी यांनाही बऱ्यापैकी उठाव मिळाला. पण, त्यांचे दर स्थिर राहिले. वांग्याच्या तुलनेत टोमॅटोची आवक चांगली राहिली. वांग्याची प्रतिदिन २० ते ४० क्विंटल आणि टोमॅटोची ५०० ते ८०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. त्या तुलनेत वांग्याला चांगला दर मिळाला. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, तर वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला.
हिरव्या मिरचीचे दर मात्र स्थिर राहिले. तिची आवकही प्रतिदन १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. तिला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला.
कांद्याच्या दरात सुधारणा कायम
कांद्याच्या दरातील सुधाररणा या सप्ताहातही पुन्हा कायम राहिली. आवक रोज २० ते ४० गाड्यापर्यंत होती. पण, ती बाहेरील जिल्ह्यातून झाली. कांद्याला किमान २०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला मागणी वाढते आहे, शिवाय दरातही सुधारणा आहे. या सप्ताहातही ती पुन्हा कायम राहिली.

0 comments:
Post a Comment