हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून हळद खरेदी केली. ती व्यापाऱ्यांनी ७२ तासांच्या कालावधीत मार्केट यार्डातून उचलून इतर ठिकाणी साठवावी. अन्यथा, संबंधित व्यापाऱ्यांची हळद खरेदी बंद करण्याचा निर्णय बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. थकीत मार्केट शुल्काचा भरणा वेळेत करा,’’ असे आवाहन बाजार समितीचे सभापती हरिचंद्र शिंदे, सचिव महासेन प्रधान यांनी केले.
संत नामदेव हळद मार्केट यार्डात हळदीचे जाहीर लिलाव पद्धतीने खरेदी केली जाते. खरेदी केलेली हळद मार्केट यार्डातून ७२ तासांच्या कालावधीत इतर गोदामांमध्ये साठवणे आवश्यक आहे. परंतु, अनेक व्यापारी मार्केट यार्डातून हळद उचलत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेली हळद साठविण्यासाठी जागा शिल्लक नसते. त्यामुळे निवाऱ्याच्या बाहेर हळदीच्या पोत्याची साठवणूक करावी लागते. ती पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. याबद्दल शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रारी केल्या होत्या.
बुधवारी (ता. ९) शिंदे, प्रधान, संचालक मंडळाचे सदस्य, अडत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी व्यापाऱ्यांकडील मार्केट शुल्कच्या थकीत रकमेपैकी ५० टक्के रक्कम येत्या मंगळवार (ता. १५) पर्यंत आणि उर्वरित ५० टक्के रक्कम बुधवार (ता. ३०) पर्यंत बाजार समितीकडे भरावी. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली हळद मार्केट यार्डातून ७२ तासांच्या आत उचलावी, अन्यथा संबंधित व्यापाऱ्यांची खरेदी बंद करण्यासह त्याला एक हजार रुपये दंड लावण्यात येईल, अशा सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

0 comments:
Post a Comment