सांगली ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे उत्पादन ३० हजार टनाने वाढून २ लाख टनांवर पोचले होते. तरीही बेदाण्याचे दर स्थिर आहेत. बेदाण्याला प्रतिकिलोस सरासरी ११० ते २०५ रुपये असा दर मिळत आहे. दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता, असल्याची माहिती तासगाव येथील बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
राज्यात यंदा बेदाण्याचे २ लाख टन उत्पादन झाले. हंगामाच्या सुरवातीपासून बेदाण्याला मागणी कमी होती. त्यामुळे बेदाण्याच्या दरात चढ-उतार होता. गेल्या तीन महिन्यांपासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. तासगाव येथील बाजार समितीत ८०० टन बेदाण्याची विक्री होते आहे. मागणी कमी असल्याने बेदाण्याचा उठावही कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा शीतगृहात ठेवला होता. होळी, गणेशोत्सव या सणांदरम्यान बेदाण्याची मागणी किंचित वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री केली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बेदाण्याची विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तासगाव बाजार समितीत सांगली जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्याचा काही भाग, कर्नाटक भागातून बेदाणा सौद्यासाठी येऊ लागला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात असेच दर होते. यंदाच्या दसरा आणि दिवाळी सणानिमित्त बेदाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. राज्यात सध्या ७० ते ८० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.
बेदाण्याचे सरासरी दर (प्रतिकिलो-रुपये)
- काळा - ४५ ते ९०
- पिवळा - १०५ ते १६५
- हिरवा - ११५ ते २०५

0 comments:
Post a Comment