कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (सोमवारी) पार पडलेल्या सौद्यात उच्चप्रतीच्या गुळाला ५५०० रुपये क्विंटल दर मिळाला. किमान दर ४००० रुपये क्विंटल दरम्यान राहिला. पन्हाळा तालुक्यातील माजनाळ येथील शेतकरी महादेव पाटील यांच्या गुळाला हा दर मिळाला.
विक्रमसिंह खाडे यांच्या अडत दुकानात हे सौदे निघाले. या वेळी सभापती बाबासो. लाड, उपसभापती संगीता पाटील, संचालक परशुराम खुडे, उदयसिंह पाटील, दशरथ माने, सचिव मोहन सालपे, उपसचिव जयवंत पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूर बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गुळाची आवक होते. परंतु यंदा ओढवलेली पूर स्थिती, ऊस पीक आणि गुऱ्हाळघरांचे झालेले नुकसान त्याचा आवकेवर मोठा परिणाम झाला आहे.

0 comments:
Post a Comment