महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका तर काश्मीर तसेच पूर्व भारतावर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक व मध्य भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा बदलत आहे. वायव्य, ईशान्य व अग्नेयेकडून वारे महाराष्ट्र व दक्षिण भारत दिशेने वाहतील. त्यामुळे तिकडील बाष्प महाराष्ट्राचे दिशेने वाहून आणतील. त्यामुळे कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात १९ व २० ऑक्टोबर रोजी चांगल्या पावसाची शक्यता राहील.
संपूर्ण विदर्भात हवामान ढगाळ राहील. मात्र, सुरवात अल्पशा पावसाची शक्यता म्हणजेच १ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता राहील. मात्र नंतर त्यात वाढ होईल. कोकणात १६ ते २५ मीटर उत्तर महाराष्ट्रात ९ ते २४ मि.मी., मराठवाड्यात १० ते २० मि.मी. व पश्चिम महाराष्ट्रात १५ ते २४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. दिनांक २० ऑक्टोबर रोजी हिंदी महासागर अरबी समुद्र व बंगाल उपसागराचे पृष्ठभागावर हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे तयार होत आहेत. त्यावर पूर्व भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वारे इशान्येकडून वेगाने वाहतील. दिनांक २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यातूनच दिनांक १९ ऑक्टोबरपासून पुढे चांगल्या पावसाची शक्यता आहे.
कोकण
रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १६ ते १८ मि.मी. पावसाची शक्यता असून रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत २४ ते २५ मि.मी. पावसाची शक्यता काही दिवशी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९२ मि.मी. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ८० टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात काही दिवशी २० मि.मि. पावसाची शक्यता असून धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत काही दिवशी २४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात काही दिवशी ९ मि.मी. पावसाची शक्यता असून त्यात वाढ होणे शक्य आहे. नाशिक व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस राहील तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९२ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आद्रता ५५ ते ६८ टक्के राहील.
मराठवाडा
मराठवाड्यातील उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत काही दिवशी १० ते १३ मि.मी. पावसाची शक्यता असून नांदेड, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत १५ ते १७ मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात काही दिवशी २० मि.मी. पावसाची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यात काही दिवशी १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, जालना औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस राहील. तसेच जालना जिल्ह्यात ते १९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस व उर्वरित जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९३ टक्के व दुपारची ६० ते ६३ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आठवड्याचे सुरवातीच्या दिवसात अल्पशा पावसाची १ ते ३ मि.मी. शक्यता आहे. मात्र, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग १ ते ४ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळी सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९१ टक्के राहील. तर दुपारची ६० ते ६५ टक्के राहील.
मध्य विदर्भ
मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता आहे. काही दिवशी १ ते ३ मि.मी. मात्र, थोड्याच कालावधीत त्यात वाढ होईल. यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७५ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आठवड्याचे सुरवातीचे काळात १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते ३२ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९२ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७६ टक्के राहील.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत काही दिवशी १४ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात काही दिवशी १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र सांगली व सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागात २१ ते २४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र, या आठवड्यात या सर्वच भागांत पावसात वाढ होणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. नगर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व सांगली जिल्ह्यांत १७ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९४ टक्के राहील तर दुपारची ६५ ते ७५ टक्के राहील.
कृषी सल्ला
- महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात रब्बी ज्वारी व हरभरा पिकांच्या पेरण्या जेथे अद्याप झालेल्या नाहीत तेथे या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर योग्य ओल म्हणजे ६५ मि.मी. ओलावा होताच पेरणी करून सारे व पाट पाडावेत. रब्बी पिकांच्या पेरण्यासाठी शक्यतो दोन चाड्याची पाभर वापरावी. एका चाड्यातून खत पेरावे तर दुसऱ्या चाड्यातून बी पेरावे. गहू पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,
सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सदस्य, कृत्रिम पावसाचे
प्रयोग सुकाणू समिती)

0 comments:
Post a Comment