- स्थानिक नाव ः बोंडारा
- शास्त्रीय नाव ः Lagerstromea parviflora Roxb.
- इंग्रजी नाव ः Small Flowered Crape Myrtle
- कूळ ः Lythraceae
- उपयोगी भाग ः कोवळी पाने
- उपलब्धीचा काळ ः वर्षभर
- प्रकार ः झाड
- अभिवृद्धी ः बिया, शाकीय वाढ
- वापर ः खाजवणाऱ्या भाजीत वापर
आढळ
अनेक ठिकाणच्या जंगलात रस्त्याच्या कडेला बोंडाराची झाडे उगवतात. कोकण तसेच पश्चिम घाटातील पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद येथील जंगलातील डोंगरकपारीला ही झाडे आढळतात.
वनस्पतीची ओळख
- ही पानझडी, वृक्षवर्गीय वनस्पती असून, ती सरासरी १५ मीटर उंच वाढते.
- वृक्षाची साल तपकिरी किंवा करड्या रंगाची असून, सालीवर उभ्या सुरकुत्या पडलेल्या दिसून येतात. कालांतराने सालीचा पातळ पापुद्रा निघालेला दिसून येतो.
- पाने साधी, समोरासमोर येणारी तसेच लंबवर्तुळाकार आकाराची व त्यांना उपपर्ण असतात.
- देठ ५ मिमी लांब, पाने ३ ते ८ सें.मी. लांब व २ ते ३ सें.मी. रुंद व त्यांना दातेरी कडा असतात.
- फुले द्विलिंगी २ मिमी आकाराची, पांढऱ्या रंगाची, सुवासिक, ६ मिमी लांबीच्या ६ पाकळ्या असतात.
- फळे आकाराने लांब असून त्यांची लांबी ३ सें.मी. असते. तसेच कच्ची फळे हिरवी तर पिकल्यावर तपकिरी रंगाची दिसतात. त्यामध्ये अनेक बिया असतात.
- एप्रिलमध्ये फुले येऊन मे-जूनमध्ये फळे तयार होतात. पावसाळ्यात येणारी कोवळी पाने खाण्यासाठी वापरली जातात.
औषधी उपयोग
- बोंडाराची पाने, फुले, साल, मुळे औषधामध्ये वापरली जातात.
- १ ते २ ग्रॅम मुळांचा वापर दिवसातून एकदा किडनी स्टोन पडेपर्यंत करावा. सालीचा वापर त्वचारोग तसेच खरुजावर केला जातो.
- फुफ्फुस नलिका दाह, मधुमेहासाठी उपयुक्त, तसेच संधिवातामध्ये सालीची पेस्ट करून चोळली जाते.
- जुलाब लागल्यावर उकडलेली कोवळी पाने शिजवलेल्या भातासोबत दिली जातात.
- डोळे लाल झाल्यास पाने पापण्यांवर ठेवली जातात, त्यामुळे आराम मिळतो.
- शेळीला अपचन झाल्यास, फुले व पानाची पेस्ट करून खाण्यास दिली जाते.
(टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार
करावेत.)
इतर उपयोग
- झाडाचे लाकूड अतिशय टिकाऊ आणि मजबूत असल्यामुळे त्याचा वापर शेतीची अवजारे व घराचे फर्निचर बनवण्यासाठी केला जातो.
- लाकडाचा वापर उत्तम जळाऊ लाकूड म्हणूनही केला जातो.
- झाडापासून खाण्यायोग्य डिंक गोळा केला जातो.
- या झाडावर अथेंरीया पफिया प्रजातीच्या अळ्या सोडल्या जातात. त्यापासून टसर प्रकारचे रेशीम तयार केले जाते.
पाककृती
पानांची पातळ भाजी
साहित्य ः ४ ते ५ बोंडाराची पाने, १ ते २ बारीक चिरलेले कांदे, ४ ते ५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, २ ते ३ चमचे लाल मिरची पावडर, १ वाटी तूरडाळ/मसूर/मूगडाळ, थोडे शेंगदाणे, १ चमचा धणे पूड, चवीपुरता गूळ, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, तेल, मीठ चवीप्रमाणे.
कृती : स्वच्छ धुतलेली बोंडाराची पाने वरीलपैकी एका डाळीसोबत शिजवून चांगली घोटून घ्यावीत. एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लसणाची फोडणी द्यावी. त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यावा. नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, शेंगदाणे टाकून नीट परतून घ्यावे. नंतर शिजवलेले वरील सर्व जिन्नस टाकून चांगले उकळून घ्यावे. चवीप्रमाणे गूळ व मीठ टाकावे.
टीप ः याची पाने कोणत्याही खाजवणाऱ्या भाजी अथवा कंदासोबत शिजवली जातात, त्यामुळे त्या भाज्या खाजवत नाहीत. पावसाळ्यात अशा खाजवणाऱ्या भाजीसोबतच ही बोंडाराची पाने दिली जातात.

0 comments:
Post a Comment