नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह जगभरात निर्यात केली जाते. अमेरिकेतील ग्राहकांना आयात होणाऱ्या कोळंबीची एन्ड-टू-एन्ड ट्रेसेबिलिटी मिळावी, यासाठी वॉलमार्ट ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे भारतातील मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या कोळंबीची विदेशांतील व्यापाऱ्यांना माहिती मिळेल.
भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनामध्ये कोळंबी निर्यातीचा वाटा मोठा आहे. भारतीय कोळंबीला अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे. २०१८ मध्ये भारतातून निर्यात झालेल्या एकूण कोळंबी निर्यातीपैकी ४६ टक्के निर्यात ही अमेरिकेत झाली होती. ‘‘ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे कोळंबी पुरवठ्याची साखळी मजबूत होईल आणि ग्राहकांचा उत्पादनावरील विश्वास वाढीस लागेल, याचा फायदा मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना होईल. तसेच भारत पसंतीचे मत्स्योत्पादक म्हणून पुढे येईल, सोबतच अमेरिकेतील ग्राहकांसाठीची ट्रेसेबिलिटी आणि पारदर्शकता वाढीस मदत होईल,’’ असे वॉलमार्टने म्हटले आहे.
भारतातील कोळंबी उत्पादनाचे आगार आंध्र प्रदेशात आहे. अमेरिकेतील किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून तो वृद्धिंगत करण्यासाठी, तसेच आंध्र प्रदेशातील कोळंबी उत्पादनाची दीर्घकालीन शाश्वत उद्योग म्हणून वाढ व्हावी, यासाठी गुणवत्तेचा दर्जा वाढविणे आणि अमेरिकेच्या निरीक्षण तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बळ मिळणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानात माहितीचे डिजिटल संकलन आणि गुंतागुंतीच्या पुरवठा साखळी नेटवर्कला ही माहिती सुरक्षित आणि विश्वासपूर्ण पातळीवर पुरविली जाते.
प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी वॉलमार्ट कंपनीने आंध्र प्रदेशातील एक मत्स्य प्रक्रिया कंपनीसोबत काम करत आहे.
ग्राहकांचा विश्वास वाढेल
कोळंबी पुरवठ्यात ब्लॉकचेन आणल्याने निर्यातीसाठीच्या उत्पादनाचे निकष पालनासाठी गुणवत्ताविषयक माहिती आणि ती माहिती ग्राहकांपर्यंत पोचविणे, तसेच शेतात उत्पादनापासून ते वाहतुकीविषयीची ट्रेसेबिलिटीसाठी मिळण्यासाठी फायदा होईल. या तंत्रज्ञानामुळे कोळंबी पालन आणि प्रक्रिया करताना अन्न सुरक्षा मानदंडाचे पालन करता येईल. यामुळे उत्पादनावरील ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत होऊन आणि याचा फायदा येथील कोळंबी शेती वाढीस होईल. तसेच जागतिक पातळीवर बाजारपेठही निर्माण होईल, असे वॉलमार्टने म्हटले आहे.

0 comments:
Post a Comment