जळगाव - गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेली कापूस खरेदी विविध खेड्यांवर जेमतेम अशीच सुरू आहे. यातच ओल्या मालाच्या नावाने कापसाची अनेक भागात ३१०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे खरेदी होत आहे. दुसरीकडे खेतिया (जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथील बाजारात मागील आठवड्यात चांगल्या कापसाला ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर लिलावात मिळाला.
मध्य प्रदेश व इतर भागातील बाजारपेठांत झालेली दरातील सुधारणा जळगाव, धुळे जिल्ह्यातील खेड्यांपर्यंत पोचली नसल्याची स्थिती आहे. खेतिया बाजारपेठेत दर वधारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम चोपडा, शिरपूर (जि. धुळे), यावल, जळगाव, धरणगावपर्यंत पोचतो.
चोपडा तालुक्यात सध्या खेडा खरेदीत (थेट गावात जाऊन खरेदी) ३१०० ते ४५०० रुपये दराने कापसाची खरेदी होत आहे. कोरड्या मालाचे दर अनेक भागात सुधारले असून धरणगाव, जळगाव, बोदवड, जामनेर भागातील जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू झाले आहेत. मध्य प्रदेशातील सेंधवा, पानसेमल, खेतिया बाजारात कापसाची आवक वाढू लागली आहे.
यंदा ही आवक उशिरा सुरू झाली. कारण यंदा विजयादशमीपर्यंत पाऊस पडल्याने कापूस वेचणी रखडली. आता वेचणी सुरू आहे. परंतु वेचणीसाठी मजूरटंचाईचा फटका बसत आहे. हा फटका बसत असल्याने पाच रुपये प्रतिकिलो या दरात वेचणी करून घ्यावी लागत आहे. कापसाचे दर किमान ५००० ते ५२०० रुपये जागेवरच किंवा खेडा खरेदीत मिळावेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण आता दर्जेदार, कोरडा कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत आहे.

0 comments:
Post a Comment