Sunday, October 6, 2019

बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणी

रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५० सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करून, त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सें.मी. अंतरावरील २ ते ४ ओळी घेता येतात. तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकण यंत्राच्या साहाय्याने बियाणे व खते पेरता येतात. पिकांच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारशीनुसार कमी - जास्त करता येते.

मराठवाडा विभागातील पावसाचे प्रमाण बघता, सप्टेंबर महिन्यातील पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हरभरा पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते. केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद (क्रीडा) यांनी बीबीएफ यंत्र(रुंद वरंबा सरी) विकसित केले आहे. या यंत्राच्या साहाय्याने पिकानुसार योग्य रुंदीचे वरंबे (६० ते १५० सें.मी.) तयार करता येतात. त्याचसोबत जास्त अंतर असलेल्या पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या तीन ते चार ओळी रुंद वरंब्यावर घेता येतात. गरजेनुसार यंत्रात थोडेफार बदल करून, उत्तम पेरणी करता येते.

बीबीएफ यंत्राचे भाग ः

१) यंत्रासोबत पेरणीयंत्र, बियाणे व खताची पेटी विविध कप्यासह उपलब्ध करून दिली आहे.
२) याच्यामध्ये दोन फाळ, चार छोटे पेरणीचे फण, आधार देणारी दोन चाके आणि ही संपूर्ण यंत्रणा चालविणारे चाक आहे.
३) यंत्राच्या वापरासाठी ३५ ते ४५ ते ५० अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर पुरेसे आहे.
४) यंत्राची लांबी २२५० मि.मी., रुंदी ११३३ मि.मी. तर उंची साधारण ८६८ मि.मी. आहे. त्याच्या चौकटीची लांबी २२५० मि.मी, रुंदी ४८० मि.मी. आणि तिचे वजन अंदाजे २८५ किलो आहे.
५) यंत्रामध्ये ३० ते ४५ सें.मी. अंतराच्या बदलासह चार फण आहेत. तसेच ३० ते ६० सें.मी. रुंद सरीच्या बदलासह १५० ते १८० सें.मी. अंतरावर कमी किंवा जास्त करता येणारे दोन सरीचे फाळ देण्यात आले आहेत.
६) यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५० सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करून, त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सें.मी. अंतरावरील २ ते ४ ओळी घेता येतात.
७) तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकण यंत्राच्या साहाय्याने बियाणे व खते पेरता येतात. पिकांच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारशीनुसार कमी - जास्त करता येते. हेक्‍टरी आवश्‍यक तेवढी रोपांची संख्या ठेवता येते.
८) हरभरा पिकाच्या एका रुंद वरंब्यावर तीन ते चार ओळी (आवश्‍यक अंतरानुसार) घेता येतात. यासाठी दोन ओळीतील अंतर गरजेनुसार ३० किंवा ४५ सें.मी. कमी जास्त करता येते.
९) वरंब्याची आवश्‍यक तितकी रुंदी मिळवण्यासाठी, ठरावीक अंतरावर खुणा करून (म्हणजेच दोन फाळात आवश्‍यक अंतर ठेवून) त्यावर ट्रॅक्‍टरला जोडलेले बीबीएफ यंत्र बाजूने चालवावे. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सरी आवश्‍यकतेनुसार ३० ते ४५ सें.मी रुंदीच्या पडतात.

हरभरा लागवडीच्या पद्धती ः

१) एका रुंद वरंब्यावर चार ओळी, ३० सें.मी. अंतर ः
एका वरंब्यावर ३० सें.मी. अंतरावर हरभरा पिकाच्या चार ओळी घेताना, सरी घेण्यासाठी खुणा म्हणजेच फाळातील अंतर १५० सें.मी. (१.५ मीटर) ठेवावे. ट्रॅक्‍टरचलीत बीबीएफ यंत्र फाळाचा मध्य खुणेवर घेऊन चालवावे. यामुळे १२० सें.मी. अंतराचा रुंद वंरबा तयार होतो. त्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी ३० सें.मी. अंतरावर बसतात. या वेळी दोन्ही बाजूच्या सरी ३० सें.मी. रुंदीच्या पडतात.

२) एका रुंद वरंब्यावर तीन ओळी, ३० सें.मी. अंतर ः
एका वरंब्यावर ३० सें.मी. अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घेताना, ९० सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करावा लागतो. जमिनीच्या प्रकारानुसार दोन्ही बाजूच्या सरी ३० सें.मी. रुंदीच्या पडतात. त्यासाठी दोन फाळातील अंतर १२० सें.मी. ठेवून, बीबीएफ यंत्र फाळाचा मध्य खुणेवर घेऊन चालवावे लागते. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सरी या गरजेनुसार ३० सें.मी. किंवा कमी जास्त रुंदीच्या मिळू शकतात.

३) एका रुंद वरंब्यावर तीन ओळी, ४५ सें.मी. अंतर ः
एका वरंब्यावर ४५ सें.मी.अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घेण्यासाठी, १३५ सें.मी. रुंदीचा वरंबा तयार करावा. त्यासाठी दोन फाळातील अंतर १८० सें.मी. ठेवून बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. या वेळी दोन्ही बाजूच्या सरी या ४५ सें.मी. रुंदीच्या पडतात, त्यांची रुंदी कमी जास्त करता येते.

रुंद वरंबा सरी पद्धतीचे फायदे ः

१) चांगली मशागत होऊन बियाण्यांसाठी चांगले गादीवाफे तयार होतात. यामुळे पिकांची उगवण व पुढील वाढ चांगली होते.
२) पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
३) रुंद वरंब्यावर पीक असल्याने पिकाला नेमके पाणी मिळते.
४) दोन्ही बाजूने असलेल्या सरींमुळे अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. यामुळे पाणी व हवा यांचे संतुलन राखले जाऊन पिकाची जोमदार वाढ होते.
५) यंत्राने एकाचवेळी आवश्‍यक रुंदीचे वरंबे, दोन्ही बाजूने सऱ्यांसह तयार होतात. एकाचवेळी बियाणे पेरणी व खते देण्याचे कामही होते. त्यामुळे वेळ, मजुरी, खर्च, इंधन यात बचत होते.

हरभरा लागवडीसाठी ठळक बाबी ः

१) जमीन : मध्यम ते भारी
२) पेरणीचा कालावधी :
-कोरडवाहू - १ ते १५ ऑक्‍टोबर
-बागायती - ऑक्‍टोबरमधील शेवटचा आठवडा ते नोव्हेंबर पहिला आठवडापर्यंत.
३) हेक्‍टरी बियाणे (बियाण्यांचा आकार/वजन/ जात लक्षात घेऊन) : हेक्टरी ५० ते ७५ किलो
४) लागवडीचे अंतर (सर्वसाधारण) :
-कोरडवाहू हरभरा : ३० बाय‌ १० सेंमी
-बागायती हरभरा : ४५ बाय १० सेंमी
५) हेक्‍टरी खतांची मात्रा :
-कोरडवाहू ः हेक्टरी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद
-बागायती : हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि २५ ते ३० किलो पालाश
(पालाशची मात्रा माती परीक्षणानुसार द्यावी)
६) बीज प्रक्रिया :
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी. नंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. उदा. (रायझोबियम अधिक पीएसबी ) २०० मिलि प्रति १० किलो किंवा रायझोबीयम २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

- डॉ. आनंद गोरे ः ९५८८६४८२४२
- अभिजित कदम ः ८९९९२८२६७९

(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

News Item ID: 
18-news_story-1570352857
Mobile Device Headline: 
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणी
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture stories in marathi BBF technique for plantation of horse pea
Author Type: 
External Author
डॉ. आनंद गोरे, अभिजित कदम
Search Functional Tags: 
यंत्र, Machine, खत, Fertiliser, विभाग, Sections, ऊस, पाऊस, रब्बी हंगाम, कोरडवाहू, हैदराबाद, बीबीएफ यंत्र, BBF Planter, तण, weed, इंधन, बागायत, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment