Monday, November 25, 2019

नगरला सोयाबीनची आवक वाढली

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात १७७७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला २८०० ते ३७०० रुपयांचा दर मिळाला आहे. लाल मिरचीचीही चांगली आवक होत आहे. भाजीपाल्याच्या आवकेत सतत चढउतार होत आहे. त्यामुळे दरही कमी-जास्त होत आहेत. 

नगर बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होत आहे. मात्र हमी दरापेक्षा कमीच दर येथे मिळत आहे. गावरान ज्वारीची ११२ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला ३१०० ते ४३०० रुपयांचा दर मिळाला. बाजरीची १४७ क्विंटलची आवक झाली आणि १७३५ ते २१५१ रुपयांचा दर मिळाला.

हरभऱ्याची २०९ क्विंटलची आवक होऊन ३००० ते ४१०० रुपयांचा दर मिळाला. मुगाची ३४ क्विंटलची आवक होऊन ५००० ते ६३०० रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीचीही गेल्या पंधरा दिवसांपासून चांगली आवक होत आहे. लाल मिरचीची आठ दिवसांत ५३१ क्विंटलची आवक झाली असून, लाल मिरचीला ५३३५ ते १७६४० चा प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मक्याची ८० क्विंटलची आवक होऊन १७२५ रुपयांचा दर मिळाला. ३११ क्विंटल गूळडागाची आवक होऊन ३०६० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला.

उडदाची १८९ क्विंटलची आवक होऊन सात हजार रुपयाचा दर मिळाला. गव्हाची आवक मात्र कमी झाली आहे. गव्हाची २८ क्विंटलची आवक होऊन २२३६ रुपयांचा दर मिळाल. तुरीची आवकही कमी झाली आहे. तुरीचा अवघी पाच क्विंटलची आवक होऊन ४००० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला.

भाजीपाल्यात टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, काकडी, गवार, घोसाळे, दोडका, कारले, घोवडा, डिंगरी, बटाटे, शेवगा, आद्रक, कोथिंबीर, पालक, करडीभाजी, मेथी यांना चांगली मागणी आहे. मात्र आवकेत व दरात सतत चढउतार होत आहेत, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. 

News Item ID: 
18-news_story-1574679671
Mobile Device Headline: 
नगरला सोयाबीनची आवक वाढली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi The soybean Incoming increased in Nagar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नगर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, ज्वारी, Jowar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nagar, Soybean, incoming, increased
Meta Description: 
The soybean Incoming increased in Nagar नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात १७७७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला २८०० ते ३७०० रुपयांचा दर मिळाला आहे. लाल मिरचीचीही चांगली आवक होत आहे. भाजीपाल्याच्या आवकेत सतत चढउतार होत आहे. त्यामुळे दरही कमी-जास्त होत आहेत. 

0 comments:

Post a Comment