Tuesday, November 19, 2019

भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून घ्या मुल्यवर्धन...

मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार महत्त्वाच्या तृणधान्यात मक्याचा समावेश होतो. जगातील तृणधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के मक्याचे उत्पादन असते. जगातील अन्नधान्यामध्ये - औद्योगिक वापरासाठी मक्याचा उपयोग सर्वात अधिक आहे. भारतात क्षेत्रफळाच्या बाबतीत मका हे भात, गहू, ज्वारी आणि बाजरी यानंतर पाचव्या क्रमांकाचे पीक आहे. मक्याचे उत्पादन भारतातील सर्व राज्यांमध्ये होते. 

मक्यातील पोषक तत्त्वे : भारतीय मक्याच्या दाण्यात सर्वसाधारणपणे पुढील घटक असतात. कर्बोदके ६६.२ टक्के, जलांश १४.९ टक्के, प्रथिने ११.१ टक्के, स्निग्ध पदार्थ ३.६ टक्के, तंतू २.७ टक्के, खनिज पदार्थ १.४ टक्के 

मका हे तृणधान्य विविध प्रकारच्या औद्योगिक प्रक्रियेसाठी वापरला जातो. त्यात प्रामुख्याने खालील पदार्थाचा  समावेश आहे. 
१) मका स्टार्च २) पॉप कॉर्न (मका लाह्या) ३) मका पोहे ४) मका तेल ५) मका अंकुर ६) मका भरड ७) मका पीठ ८) मका कोंडा / टरफल ९) मका ग्लूटेन 

मका स्टार्च 
मका स्टार्च हे एक तृणधान्य स्टार्च असून, त्यामध्ये प्रथिने व खनिज द्रव्यांचे प्रमाण कमी असते. मका स्टार्चच्या जास्त शुद्धतेमुळे त्याचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत. मक्यामध्ये ६६ टक्के स्टार्चचे प्रमाण असून ते अनेक प्रक्रियेद्वारे वेगळे केले जाते. त्यामध्ये भिजवणे, दळणे आणि वाळविणे, आर्द्र दळण या पद्धतीचा समावेश होतो. सल्फुरस आम्लाच्या गरम व विरल द्रावणात स्वच्छ केलेले मक्याचे दाणे ३६-४८ तास बुडवून ठेवतात. या क्रियेमुळे दाण्यावरील टरफल निघून ग्लुटेन मऊ होते व स्टार्चचे विरंजन होते. यंत्राच्या साह्याने अंकुर व टरफल वेगळी काढली जातात. शुष्क दळूण स्टार्च व ग्लूटेन केंद्रोत्सारी यंत्राच्या साह्याने वेगळी केली जातात. स्टार्चवर संस्करण करून डेक्स्ट्रोज, मका पाक व मका स्टार्च वेगळे केले जातात. स्टार्चचे अनेक खाद्य व 
अखाद्य उपयोग आहेत. भारतात दरवर्षी ७०-८० हजार टन स्टार्चचे उत्पादन होते. 

मका स्टार्चचे उपयोग 
मका स्टार्चचा वापर प्रामुख्याने कागद, कापड, अन्नप्रक्रिया, औषधी या उद्योगामध्ये केला जातो. 

२) पॉप कॉर्न / मका लाह्या 
पॉप कार्न हे जगातील अत्यंत लोकप्रिय स्नॅक फुड आहे. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्व वर्गातील ग्राहकांना ह्याची चव आवडते. मक्याचे स्टार्च व प्रथिने हे टणक अशा कवचामध्ये बंद असतात. स्टार्च पाण्याच्या योग्य प्रमाणात येईपर्यंत त्याला भिजवून घेऊन कोरडे केले जातात. उच्च तापमानात ते ठेवले असता स्टार्चमधील पाण्याचे रूपांतर होऊन उच्च तापमानाची वाफ एका हलक्या स्फोटाने बाहेर पडते. तेच पॉप कॉर्न होय. हे पॉपकार्न अत्यंत कुरकुरीत, स्वादिष्ट असतात. त्यावर थोडासा मसाला, मीठ टाकून त्याची चव वाढविले जाते. 

३) मका पोहे (काॅर्न फ्लेक्स)  
मका पोहे हा जगातील अत्यंत लोकप्रिय न्याहरीचा पदार्थ आहे. भारतामध्येदेखील मोठ्या प्रमाणात मका पोह्याचा वापर केला जातो. त्यात प्रामुख्याने न्याहरी व चिवडा ह्या प्रकारामध्ये वापर होतो. ते करण्यासाठी मक्याचे तुकडे (ग्रीट) योग्य आर्द्रता, पाण्याचे प्रमाण व उष्णता ह्या बाबीचे संतुलन राखून स्टीलच्या रोलर मीलमधून उच्च दाब प्रक्रियेद्वारे निर्माण केला जातो. 

संपर्क ः शैलेंद्र कटके, katkesd@gmail.com 
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

News Item ID: 
18-news_story-1574165359
Mobile Device Headline: 
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून घ्या मुल्यवर्धन...
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture story in marathi, corn processing
Author Type: 
External Author
शैलेंद्र कटके,  डॉ. अरविंद सावते 
Search Functional Tags: 
तृणधान्य, गहू, यंत्र, Machine
Twitter Publish: 
Meta Keyword: 
agriculture, maize, corn processing
Meta Description: 
value addition of corn by processing. जगातील तृणधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के मक्याचे उत्पादन असते. मका विविध प्रकारच्या औद्योगिक प्रक्रियेसाठी वापरला जातो.

0 comments:

Post a Comment