Thursday, November 28, 2019

हळद, गवार बीच्या फ्युचर्स किंमतीत घट

या सप्ताहात हरभरा, गवार बी, हळद व गहू यांच्या भावात घट झाली. इतर पिकांमध्ये वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने गवार बी व हळद वगळता इतर सर्व पिकांच्या फेब्रुवारी/मार्च फ्युचर्स किमतींत वाढ दिसून येत आहे.

आता खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. खरीप पिकांच्या विक्रीचे व रबीच्या उत्पादनाचे नियोजन करण्याची ही वेळ आहे. या अंकात आपण मक्याचा तपशील पाहू. मक्याचा हमी भाव रु. १,७६० आहे. या वर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे खरीप पिकावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. मात्र रब्बी पीक चांगले येईल अशी अपेक्षा आहे. भारतातील सध्या मक्याची स्पॉट किमत रु. १,८५० आहे. डिसेंबर फ्युचर्स किमत १,९०१ आहे. ती चांगल्या रबी पिकाच्या उत्पादनामुळे फेब्रुवारी डिलिवरीसाठी रु. १,८७५ असेल. या परिस्थितीत सध्यातरी भाव वाढण्याची शक्यता कमी वाटते.

गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.
मका (खरीप)
खरीप मक्यामध्ये अजून फारसे व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात रु. २,००० ते रु. २,०६० च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती २.४ टक्क्यांनी वाढून रु १,९०१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. १,८५० वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,६६२ ते रु. ३,८२२). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,०४२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,०२४ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. फेब्रुवारी डिलिवरीसाठी रु. ४,०८२ भाव आहे. सोयाबीन मधील तेजी अजून कायम राहण्याची शक्यता आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती १८ ऑक्टोबरपर्यंत उतरत होत्या. (रु. ६,१२० ते रु. ५,७२०). नंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या ३.८ टक्क्यांनी उतरून रु. ५,६०० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ५,९४९ वर आल्या आहेत. एप्रिलच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ५,९९६).

गहू
गव्हाच्या (डिसेंबर २०१९) किमती १६ ऑक्टोबरपासून उतरत होत्या. (रु. २,१८० ते रु. २,१३६). या सप्ताहात त्या रु. २,१४१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१३३ वर आल्या आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१६१).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,९३८ ते रु. ४,११८). गेल्या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,२९४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,११८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,०७० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती ०.६ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,२०८).

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२४७ ते रु. ४,५२०). या सप्ताहात त्या ०.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,४४४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३५७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मार्चमधील फ्युचर्स किमती १.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४३४).

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर मध्ये वाढत होत्या. (रु. १८,९०० ते रु. १९,४१०). या सप्ताहातसुद्धा त्या १ टक्क्याने वाढून रु. १९,३२० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,५१९ वर आल्या आहेत. फेब्रुवारी च्या फ्युचर्स किमती रु. १९,३२० वर आलेल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.९ टक्क्यांनी अधिक आहेत.

मूग
मुगाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ६,२९१ ते ६,५८९). या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,६५० वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,५४१ वर आल्या आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती रु. ७,०९० वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत.

बासमती तांदूळ
बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,२५० वर आल्या आहेत. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com 

News Item ID: 
18-news_story-1574931587
Mobile Device Headline: 
हळद, गवार बीच्या फ्युचर्स किंमतीत घट
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture story in marathi forward market for agriculture commodities
Author Type: 
External Author
डॉ. अरुण कुलकर्णी
Search Functional Tags: 
हळद, सोयाबीन, कापूस, मूग
Twitter Publish: 
Meta Keyword: 
forward market for agriculture commodities
Meta Description: 
forward market for agriculture commodities या सप्ताहात हरभरा, गवार बी, हळद व गहू यांच्या भावात घट झाली. इतर पिकांमध्ये वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने गवार बी व हळद वगळता इतर सर्व पिकांच्या फेब्रुवारी/मार्च फ्युचर्स किमतींत वाढ दिसून येत आहे.

0 comments:

Post a Comment