Friday, November 8, 2019

कृषी अवशेष, रबर यांच्या मिश्रणापासून पर्यावरणपूरक कुंड्या

शहरामध्ये अंगण नसले तरी गच्ची, गॅलरीमध्ये कुंड्यांत लहानमोठ्या झाडांची लागवड करून हौस भागवली जाते. अलीकडे घरे किंवा कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीमध्येही झाडांचा वापर केला जातो. यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंड्या या प्रामुख्याने मातीच्या पारंपरिक प्लॅस्टिक किंवा रबराच्या असतात. मात्र, या प्रकारच्या कुंड्यांच्या स्वतःच्या अशा मर्यादा आहेत.

मातीच्या कुंड्या ः
चिकण माती कुंड्या घट्ट आणि वजनदार असतात. वातावरणातील उष्णतेमुळे चिकण माती जलद गतीने आर्द्रता सोडते. कुंडीमधील माती कोरडी होत राहते. ते रोखण्यासाठी वारंवार पाणी द्यावे लागते. या सततच्या शुष्क आणि आर्द्र चक्रामुळे कुंड्या भुसभुशीत होतात आणि फुटतात. या पाणी देण्यामुळे लाल काळी माती वाहून जमिनीवर पसरते.

प्लॅस्टिक कुंड्या ः
या कुंड्या पुरेशा लवचीक, वजनाला हलक्या आणि विविध रंगांत उपलब्ध आहेत. मात्र, प्लॅस्टिकच्या पातळ थरातून विशेषतः उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे वहन किंवा रोधन प्रभावीपणे होत नाही. परिणामी रोपांच्या मुळांना नुकसान पोचते व झाडांची वाढ खुंटते. दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे रंगीत कुंड्या फिकट बनतात. कालांतराने ठिसूळ होऊन फुटतात. यासोबतच प्लॅस्टिकचे जैव-विघटन होत नसल्यामुळे या कुंड्या पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरतात.

नैसर्गिक रबरयुक्त कुंड्या ः या वजनाने हलक्या, लवचीक आणि अनियमित तापमानातही टिकण्याच्या गुणधर्मामुळे ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. मात्र, नैसर्गिक रबराचा कमकुवतपणा आणि अतिलवचीकता यामध्ये वहनामध्ये किंवा उपयोगामध्ये अनेक मर्यादा आणतात.

चिकण मातीचे दुर्भिक्ष, प्लॅस्टिकवर आलेली बंदी किंवा नैसर्गिक रबराच्या कुंड्यांतील त्रुटी या बाबींवर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील सिरकॉट या संस्थेने कृषी अवशेषांपासून मजबूत आणि उत्तम लवचीक असलेले नैसर्गिक रबरराइज्ड कंपोजिट विकसित केले आहे.

सिरकॉट या संस्थेला कपाशीतील टाकाऊ घटक, नारळाचा काथ्या, केळीचा खांब, भाताचा भुसा आणि अन्य नैसर्गिक कृषी जैविक अवशेषांचा वापर करून कंपोजिट्स विकसित करण्याचा समृद्ध अनुभव आहे. दरवर्षी टनावारी वाया जाणाऱ्या कृषी अवशेषांचा विधायक वापर करण्यासाठी संस्थेने टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही कंपोजिट बनवली आहेत.
विविध कृषी अवशेष नैसर्गिक रबरामध्ये मिसळून ताकदवान रबरयुक्त संमिश्र घटक तयार केले जाते. या मिश्रणात विविध रंग मिसळल्याने आकर्षकता वाढते. पुढे हे रबरयुक्त घटकांची योग्य त्या जाडीचे शीट्स बनवतात. त्यावर विशिष्ट तापमान आणि दाब देत विविध आकाराच्या कुंड्या किंवा अन्य वस्तू बनवता येतात.

  • या रबरयुक्त कुंड्या पारंपरिक कुंड्यांपेक्षा १०-१५ पट अधिक टिकाऊ असून आकार स्थिरता, मजबुती, लवचीकतेसोबत प्रभावी उष्णतारोधक आहेत. त्याचा फायदा रोपांच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारे होतो.
  • या कुंड्या वजनाला हलक्या व लवचीक असल्यामुळे वाहतूक आणि हाताळणी सुलभ होते.
  • आकर्षक आरेखन आणि रंगसंगतीमुळे घर व कार्यालयातील सुशोभीकरणासाठी उपयुक्त ठरतात.
  • वाजवी किंमत आणि जैव-विघटनशीलतेमुळे पर्यावरणपूरक ठरतात.
  • या तंत्रज्ञानामुळे पिकातील शिल्लक अवशेषापासून शेतकऱ्यांना काही मूल्य मिळणे शक्य होणार आहे. तसेच नॉन-टायर क्षेत्रात नैसर्गिक रबराचेही मूल्यवर्धन साध्य होते. यातून रबराची शेती करणारे शेतकरी आणि रबर उद्योगाला अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शाश्वत संधी प्राप्त झाली आहे.

संपर्क ः ०२२-२४१२७२७३/७६ विस्तारित १४० / १४१
केंद्रीय कपाशी तंत्रज्ञान संशोधन संस्था, अंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद, मुंबई.)

News Item ID: 
18-news_story-1572850416
Mobile Device Headline: 
कृषी अवशेष, रबर यांच्या मिश्रणापासून पर्यावरणपूरक कुंड्या
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture story in marathi, Environment friendly pots from agril. waste and rubber
Author Type: 
External Author
डॉ. पी. जी. पाटील, डॉ. ए. के. भारीमल्ला, श्रीमती. प्राची म्हात्रे
Search Functional Tags: 
पर्यावरण, केळी, उत्पन्न
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment