Tuesday, November 5, 2019

डाळिंबांच्या आवकेत घट, बाजारभाव स्थिर

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबांची आवक २२१२ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवक घटली आहे. बाजारपेठेत मागणी सर्वसाधारण आहे. बाजारभाव स्थिर आहेत. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ३७५० व मृदुला वाणास ६५० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ९५४ क्विंटल झाली. बाजारभाव  १७०० ते ४१५० प्रतिक्विंटल होते. बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने बाजारभाव कमी झाल्याचे दिसून आले. बटाट्याची  ८७७४ क्विंटल आवक झाली. बाजारभाव ८०० ते १५००  प्रतिक्विंटल होते.

लसणाची आवक ३४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आल्याची आवक ९३ क्विंटल झाली. त्यास ५५००ते ६६०० प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत दरात घसरण झाल्याचे दिसून आले. या सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ११२३८ क्विंटल झाली.  तिला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. घेवड्याला ५००  ते १२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ४८५ क्विंटल झाली. मागणी कमी असल्याने तिच्या बाजारभावात घट झाली. लवंगी मिरचीला १४०० ते २००० रुपये, तर ज्वाला मिरचीला १३०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.  वाटाण्याची आवक २०७ क्विंटल झाली. चालू सप्ताहात वाटण्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून बाजारभाव स्थिर आहेत. त्यास ८७०० ते १००००  प्रतिक्विंटल दर मिळाला. 

चालू सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाल्याने बाजारभावात सुद्धा चढ उतार दिसून आला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते ६००,  वांगी २७० ते ४५०, फ्लॉवर ८५ ते १८५ असे प्रति १४ किलोस दर मिळाले. कोबी ८० ते १६० असा प्रति २० किलोस दर मिळाला . ढोबळी मिरचीला २९० ते ४०० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा २५०  ते ४००,  कारले १३० ते २५०,  गिलके २९० ते ४५०, भेंडी २४० ते ३०० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला २०० ते ३५०, लिंबू  ३०० ते ५००, दोडका १८० ते २५० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ६३० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक ३१८ क्विंटल झाली. तिला ३००० ते ५५ ०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

News Item ID: 
599-news_story-1572939667
Mobile Device Headline: 
डाळिंबांच्या आवकेत घट, बाजारभाव स्थिर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
agriculture news Pomegranate
Author Type: 
External Author
मुकुंद पिंगळे
Search Functional Tags: 
डाळिंब, बाजार समिती, agriculture Market Committee, नाशिक, Nashik
Twitter Publish: 
Meta Description: 
agriculture news Pomegranate Agriculture News: बाजारपेठेत मागणी सर्वसाधारण आहे. बाजारभाव स्थिर आहेत. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ३७५० व मृदुला वाणास ६५० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
Send as Notification: 
Topic Tags: 

0 comments:

Post a Comment