द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. बागेत परतीची पाऊस वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील बागांसाठी हानिकारक ठरत आहे. सध्याच्या परिस्थितीत बागेत प्रीब्लूम अवस्था ते मणी सेटिंगची अवस्था दिसून येते. या व्यतिरिक्त काही बागेत फळछाटणी ही नुकतीच झाली किंवा आता डोळे फुटत असलेली परिस्थिती आहे. अशा बागेत या वेळी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.
१) शेंडा वाढ, गळकूज होणे ः
प्रत्येक बागेत सतत होत असलेल्या पावसामुळे वेलीवर सध्या वाढ जोरात सुरू आहे. बागेतील सतत वाढत असलेल्या आर्द्रतेमुळे फक्त शेंडावाढ होत नसून, बगलफुटीसुद्धा जोमात होत आहे. यामुळे कॅनोपीमध्ये गर्दी वाढून दमट वातावरण तयार झालेले दिसून येईल. यामुळे दोडा अवस्थेतील द्राक्ष घडांची गळ होताना दिसून येईल. हे टाळण्याकरिता बागेत शेंडापिंचिंग करणे, बगलफुटी काढणे, व पालाशची पूर्तता फवारणीद्वारे करणे गरजेचे आहे. याच सोबत गळ होण्यापासून संरक्षण करण्यासाठी सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी (०.७५ ते १ मि.लि. प्रति लिटर पाणी) करावी. बागेतील वाढीचा जोम कमी करण्यासाठी पालाशची पूर्तता करणे आवश्यक आहे.
२) अन्नद्रव्य व्यवस्थापन ः
सध्या प्रत्येक ठिकाणी बागेत वेलीवरील पाने पिवळी पडलेली दिसून येतील. पाने फक्त पिवळी झालेली नसून, पातळ आणि अशक्तही दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी जमिनीतून खतांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जमीन ओली असल्याच्या स्थितीमध्ये खतांचा वापर फायद्याचा नसेल. जमिनीला वाफसा येत नाही, तोपर्यंत जमिनीतून खतांचा पुरवठा टाळावा. त्यापेक्षा फवारणीच्या माध्यमातून खतांचा पुरवठा करावा. या वेळी पाने पिवळी व अशक्त असल्यामुळे कमी प्रमाणात पण कमी काळात जास्त फवारणीद्वारे (अधिक वारंवारितेने) खते देणे फायद्याचे असेल.
- द्राक्षबागेत मणी सेंटिंगपर्यंत नत्राचा वापर करण्याचे टाळावे. वाफसा परिस्थिती तयार झाल्यानंतर फक्त जमिनीतून खतांचा वापर करावा. वेलीच्या वाढीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये (फेरस, मॅग्नेशिअम व झिंक) आणि मुख्य अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद, पालाश) द्यावीत.
- ज्या बागेत पाने पिवळी पडलेली आहेत, अशा बागेमध्ये जर पूर्ण कॅनोपी असल्यास मॅग्नेशिअमची आवश्यकता असेल. याच कॅनोपीमध्ये युरिया १ ग्रॅम अधिक झिंक सल्फेट ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- यानंतर मॅग्नेशिअम सल्फेट ३ ग्रॅम अधिक फेरस सल्फेट २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी करण्यापूर्वी फवारणी पाण्याचा सामू हा अॅसिडिक (म्हणजेच ५.५ ते ६ पीएच) असावा. पाण्याचा हा सामू मिळवण्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर करता येईल.
- मण्यांचा विकास होत असलेल्या अवस्थेमध्ये (मणी सेटिंग ते ८ मि.मी.) कॅल्शिअमची पूर्तता करावी. कॅल्शिअम नायट्रेट किंवा कॅल्शिअम क्लोराईड २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा कॅल्शिअम इसेंस ०.७५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

0 comments:
Post a Comment