पुणे - मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी, मॉन्सूनोत्तर पावसाचे वाढलेले दिवस आदी कारणांनी कांदा पिकाचे झालेले नुकसान आणि जुन्या कांद्याच्या टंचाईमुळे बाजारातील कांद्याची आवक घटली आहे. परिणामी, कांद्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र शासनाने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारचे अर्थ सल्लागार आणि नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी ए. के. चौधरी यांनी एक लाख टन कांदा आयात करण्याबाबतचे पत्र एमएमटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वेद प्रकाश यांना दिले आहे. कांद्याच्या आयातीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे दर कमी होण्याचा धोका निर्माण झाला असून, याबद्दल शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
देशातील कांदा टंचाई लक्षात घेता केंद्राने कांदा आयात सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, महिनाभरात इजिप्त आणि तुर्कस्थान येथून कांदा आयात होणार आहे. या आयात होणाऱ्या कांद्याच्या वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि शेजारील राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थितीमध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटले असून, बाजारात सध्या होणारी आवकेमध्येदेखील चांगल्या दर्जाच्या कांद्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जुन्या कांद्याला मागणी वाढली असून, त्याचे दर पुणे बाजार समितीमध्ये किलोला ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत. तर नवीन कांद्याचे दर ३० रुपयांपर्यंत आहेत. तर हेच दर किरकोळ बाजारात ८० रुपयांच्या घरात पोचले आहेत.
भविष्यात कांद्याच्या दराने शंभरी ओलांडू नये यासाठी केंद्राने आयातीचा निर्णय घेतला आहे. पुढील महिनाभरात टप्प्याटप्पाने कांदा आयात होणार असून, त्याचे वितरण नाफेड मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इराण येथून कांदा आयात होण्याची शक्यता आहे. पुढील ८-१० दिवसांत तो कांदा येईल. मात्र सध्या नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांवर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडींमुळे तेथील बाजार बंद होता, त्यामुळे पुणे बाजारात आवक वाढल्याने दर क्विंटलला १ हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. सोमवारी ६०-६५ रुपयांनी विक्री झालेला कांदा मंगळवारी ४५ रुपयांनी विक्री झाला. मंगळवारी साधारण जुन्या कांद्याची ७० ट्रक आवक होऊनदेखील ३० ट्रक माल शिल्लक आहे. तर नवीन कांद्याची १० ट्रक आवक झाली. मात्र त्याचा दर्जा खालावलेला असल्याने दर मिळत नाही.
- विलास रायकर, कांदा आडतदार, पुणे बाजार समिती

0 comments:
Post a Comment