जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १२) कोबीची १६ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते ३००० रुपये दर मिळाला. आवक नाशिक, धुळे, औरंगाबादमधील घाट परिसरातून होत आहे. मागील आठवड्यातील पावसामुळे आवकेवर परिणाम झाला असून, दरही टिकून आहेत.
बाजारात आल्याची ३२ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५२०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २६०० ते ४६०० रुपयांचा दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २२०० ते ३१०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. तिला २२०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बिटची सात क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये दर मिळाला.
वांग्यांची १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १६०० ते २८०० रुपये दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते ३२०० रुपये दर होता. डाळिंबांची २२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २४०० ते ४८०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. हिरव्या मिरचिची २८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये दर मिळाला.
भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० ते २१०० रुपये मिळाला. काशीफळाची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते ११५० रुपये दर होता. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १३०० ते २२०० रुपये दर होता. गाजराची सात क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १४०० ते २५०० रुपये दर मिळाला. बटाट्याची २८० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते १४०० रुपये दर होता.

0 comments:
Post a Comment