सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. या काळामध्ये हळद पिकावर पाने गुंडाळणाऱ्या व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडींचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाययोजना त्वरित करणे गरजेचे आहे.
पाने गुंडाळणारी अळी
- या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसून येतो.
- या किडीचा प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असून, पंख काळसर तपकिरी रंगाचे असतात. पंखावर पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका असतो.
- पूर्ण वाढलेली अळी २.५ ते ३.७ सें.मी.
- लांब व हिरव्या रंगाची (ऑलिव्ह ग्रीन) असते. या अळ्या पाने गुंडाळून त्यात लपतात. आत राहूनच पाने खातात. पूर्ण वाढ झालेली अळी पानाच्या गुंडाळीतच कोषावस्थेत जाते. कोष फिकट हिरव्या रंगाचा असतो.
- हळद पिकामध्ये या किडीच्या अंडी, अळी आणि कोष अवस्था या अनुक्रमे ४-५, १३-२५ आणि ६-७ दिवस असतात.
- नियंत्रण : किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यावर पानांवरील अळ्या व कोष या किडीच्या विविध अवस्था वेचून नष्ट कराव्यात.
- अळीने गुंडाळलेली पाने खोडून गोळा करून अळीसह नष्ट करावीत.
- क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारावे.
पाने खाणारी अळी
- पावसाळा सुरू झाल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढताच या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. पाने सुरळी किंवा पोंगाअवस्थेत असताना ही अळी पानावर उपजीविका करते. पान खाऊन सुरळीमध्ये छिद्र करते. सुरळीतील पान ज्या वेळी पूर्णपणे उलगडते (उघडते) त्या वेळी एका सरळ रेषेमध्ये पानावरती छिद्रे आढळून येतात.
- नियंत्रण
- गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावीत.
- डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
ः डॉ. मनोज माळी (प्रभारी अधिकारी), ९४०३७ ७३६१४
ः डॉ. रवींद्र जाधव, ९७६४२३४६३४
(हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र,
कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली
टीप : हळद पिकावर विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत. केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीत कीडनाशकाचा वापर करावा.

0 comments:
Post a Comment