नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. शुकवारपर्यंत (ता.८) या तीन जिल्ह्यांत सुमारे ३१७० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील येथील केंद्रांवर ६१४ क्विंटल मुगाची खरेदी झाली. परंतु अन्य ठिकाणी अद्याप खरेदी सुरू नाही. पावसात भिजलेला शेतीमाल शासकीय खरेदीच्या निकषांत बसत नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून खुल्या बाजार हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये कमी दराने खरेदी केला जात आहे.
किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट येथे खरेदी केंद्र मंजूर झाले या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीनसाठी एकूण ३३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु देगलूर, बिलोली येथे खरेदीसाठी संस्था मिळाली नाही. विदर्भ को-मार्केटिंगतर्फे भोकर, धर्माबाद, नायगाव या ठिकाणी खरेदी केंद्रे मंजूर आहेत. यापैकी धर्माबाद येथील केंद्रांवर १४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनतर्फे परभणी, जिंतूर, सेलू,पालम,पाथरी, पूर्णा या सहा ठिकाणी केंद्रे मंजूर आहेत. या ठिकाणी सुमारे १२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
परभणी आणि पूर्णा येथील केंद्रांवर ५१४ क्विंटल मुगाची खरेदी झाली. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतर्फे मानवत आणि गंगाखेड येथील खरेदी केंद्रावर १३५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात नाफेडतर्फे हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव या पाच केंद्रांवर मिळून सुमारे ८०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हिंगोली येथील केंद्रांवर ३४ शेतकऱ्यांचा १०० क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. सोयाबीन काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे मालाची प्रत खराब झाली आहे.ओलाव्याचे प्रमाणदेखील जास्त आहे.त्यामुळे शासकीय खरेदीच्या निकषांस पात्र शेतीमाल नसल्यामुळे शेतक-यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागत आहे.

0 comments:
Post a Comment