Monday, November 18, 2019

हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रण

स ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पावसाळी हंगामात हळद पिकाची शाकीय वाढ होत होण्याबरोबरच खोड व फुटवे यांची वाढ होत असते. हळदीचे गड्डे तयार होण्यासाठी हा योग्य काळ आहे. वातावरणात आर्द्रतेचे अधिक प्रमाण, ढगाळ, उबदार वातावरणामध्ये हळद पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. रोगांच्या प्रादुर्भावामुळे गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर अनिष्ठ परिणाम होतो. हे टाळण्यासाठी रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.

कंदकुज (गड्डाकुज) 

कंदकूज म्हणजेच रायझोम रॉट हा रोग फ्युजारिअम, पिथिअम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया या बुरशींमुळे होताना दिसतो. या बुरशीजन्य रोगामुळे हळद पिकाचे ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते. 
लक्षणे ः कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर रोगाची लक्षणे लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर रंगाची होतात व वाळू लागतात. खोडाचा गड्ड्यालगतचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो, त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते. 
या रोगाच्या वाढीसाठी भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन पोषक ठरते. जास्त आर्द्रता, ढगाळ उबदार हवामानामध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. 
नियंत्रण : 

  •    प्रतिबंधात्मक उपाय ट्रायकोडर्मा प्लस भुकटी प्रति एकरी २ ते २.५ किलो या प्रमाणात २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.
  •    बुंध्याभोवती आळवणी प्रति लीटर पाणी 
  •     कॉपर ऑक्सिक्लोराइड ५ ग्रॅम किंवा बोर्डो मिश्रण १ टक्के 
  •    रोगाची तीव्रता जास्त असल्यास, आळवणी प्रति लीटर 
  •     मेटॅलॅक्सिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.
  • टीप ः आळवणी वाफसा स्थितीत करावी. आळवणीनंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा.
  •    पावसाळ्यातील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी शेतामध्ये उताराला आडवे चर घ्यावेत. पाणी शेतात साठू देऊ  नये. भारी काळ्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी होतो, त्यामुळे शक्यतो अशा जमिनीमध्ये हळद लागवडीसाठी टाळाव्यात. हळद लागवडीसाठी हलकी ते मध्यम आणि पाण्याचा योग्यरित्या निचरा होणारी जमीन निवडावी. 
  •    कंदकूज प्रादुर्भावित क्षेत्रात नियमितपणे पिकांची फेरपालट करावी. हळद पिकावर परत हळद अथवा आले पीक घेऊ नये.
  •    हळद पिकाची काढणी केल्यानंतर पुढील वर्षाच्या लागवडीसाठी चांगले कंदकूज मुक्त मातृकंद निवडावेत. त्यांची योग्य पद्धतीने साठवण करून, ठराविक कालावधीनंतर साठवलेल्या कंदांना कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याची खात्री करावी. 

पानांवरील ठिपके (करपा/लीफ स्पॉट) 

   करपा हा बुरशीजन्य रोग असून, कोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे होतो.  
   वातावरणात सकाळी पडणारे धुके व दव असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. जुलै  ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते. ढगाळ व पावसाळी हवामान रोग प्रसारास अनुकूल असते.         
लक्षणे ः अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके प्रथमत: खालील पानावर पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते, वाळून गळून पडते. संपूर्ण पीक वाळलेले दिसते, अशा परिस्थितीत उत्पादनात मोठी घट होते. या बुरशीचे बिजाणू प्रादुर्भावित हळदीच्या कंदामध्ये व अन्य अवशेषात वाढतात.
नियंत्रण : 

  •    लागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे. 
  •    रोगट पाने कापून घेऊन जाळून टाकावीत. 
  •    फवारणी प्रति लीटर पाणी
  •     मँकोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ते ३ ग्रॅम.
  •     रोगाची तीव्रता जास्त झाल्यास बोर्डो मिश्रण १ टक्के फवारणी करावी. 
  • टीप : जास्त दिवस धुके राहिल्यास १५ दिवसांच्या अंतराने पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून करावी. 

पानांवरील ठिपके (लीफ ब्लॅच) 

   ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये वातावरणातील आर्द्रता ८० टक्के आणि तापमान २१-२३ अंश सेल्सिअस असते, त्या वेळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागतो. 
   टॅफ्रिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे होणाऱ्या या रोगामध्ये पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजून लालसर करडया रंगाचे १ मे २ सें. मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो. हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात. हे ठिपके फुलांवरसुद्धा आढळतात. 
नियंत्रण :   

  •    लागवडीपूर्वी बियाणे मँकोझेब २.५ ग्रॅम अथवा कार्बेन्डॅझीम २ ग्रॅम प्रति लीटर पाणी या द्रावणात ३० मिनिटे बुडवून वापरावेत. 
  •    रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी. 
  •    रोगाच्या व्यवस्थापनाकरिता फवारणी प्रति लीटर पाणी
  •     कार्बेन्डॅझीम १ ग्रॅम किंवा मँकोझेब १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम.
  •     प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.
  • टीप ः  वरील बुरशीनाशकांच्या शिफारशी ॲग्रेस्कोनुसार केलेल्या आहेत. त्यांना लेबल क्लेम नाहीत.

  ः ०२३३-२४३७२७४
 : डॉ. मनोज माळी, (प्रभारी अधिकारी) ९४०३७ ७३६१४
 : डॉ. सचिन महाजन, (वनस्पती रोग शास्त्रज्ञ) ९४२११ २८३३३ 

(कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली.)

News Item ID: 
18-news_story-1574078676
Mobile Device Headline: 
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रण
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture stories in marathi turmeric disease management
Author Type: 
External Author
डॉ. मनोज माळी, डॉ. सचिन महाजन
Search Functional Tags: 
हळद, हळद लागवड, Turmeric Cultivation, मात, mate, रॉ, ऊस, हवामान, वर्षा, Varsha, सकाळ, धुके, सूर्य
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment