पुणे : मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागात दोन ते तीन दिवसांपासून दाट धुके आणि मोठ्या प्रमाणावर दव पडत आहे. धुके आणि दवामुळे भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असून, उत्पादन खर्च वाढणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बटाटा पिके हातची गेली. द्राक्ष बागांसह फळपिकांनाही अतिपावसाचा फटका बसला. काही शेतकऱ्यांनी टोमॅटो, कारली, कांदा, सोयाबीन, बीट, काकडी, दोडका, आले आदी प्रमुख पिके घेतली आहेत.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
अतिपावसात अनेक सखल भागातील पिके सडून गेली आहेत. परंतु पाण्याचा निचरा झालेल्या जागेतील पिके पावसातून वाचली आहेत. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळनंतर दव पडण्यास सुरवात झाली आहे. रात्रभर यात वाढ होऊन पहाटे मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरते. सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वत्र धुके पसरलेले असते. पडत असलेल्या धुक्यामुळे पावसापासून वाचलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. धुके असताना आणि धुके निवळताना दवबिंदूच्या स्वरूपात जमा होणारे पाणी पिकांच्या नासाडीस कारणीभूत ठरत आहे.

0 comments:
Post a Comment