Monday, November 11, 2019

कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही वाढ

नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक वाढीस लागली आहे. सोयाबीन दरातही यावर्षी पहिल्यांदाच तेजी अनुभवली जात असून ३८०० रुपये क्‍विंटलचा दर सोयाबीन उत्पादकांना पहिल्याच आठवड्यात मिळाला आहे. यापुढील काळात दरात यापेक्षा अधिक वाढ होईल, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

मध्यप्रदेश सोयाबीन लागवड क्षेत्र आणि उत्पादकतेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, यावर्षी त्या भागात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि संततधार पावसामुळे सोयाबीन हंगामाला सर्वाधिक फटका बसला. त्याच्या परिणामी महाराष्ट्र तसेच देशाच्या इतर भागांतील सोयाबीनवर बाजाराची भिस्त राहणार आहे. हे लक्षात घेता व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला चांगले दर दिले जात आहे. 

कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात सोयाबीनची चार हजार क्‍विंटल आवक झाली. या आठवड्यात ती साडेसहा हजार क्‍विंटलवर पोचली आहे. सोयाबीनचे दर गेल्या आठवड्यात ३७०० ते ४२२९ रुपये क्‍विंटलवर पोचले होते. या आठवड्यात हे दर २९०० ते ३८२२ रुपयांवर आले आहेत. सोयाबीन दरातील तेजी कायम राहील, असा विश्‍वास व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केला. बाजारात गव्हाची देखील आवक असून २०० क्‍विंटल इतकी आवक आहे. २०५० ते २१९८ रुपये क्‍विंटलने गव्हाचे व्यवहार झाले.

तांदळाची आवक गेल्या आठवड्यात सात क्‍विंटलची होती. या आठवड्यात आवक ५० क्‍विंटलवर पोचली. तांदळाचे दर ४५०० ते ४८०० रुपये क्‍विंटलचे आहेत. बाजारातील हरभरा आवक २१३ क्‍विंटलची असून ३९३० ते ४५४४ रुपये क्‍विंटलने हरभरा व्यवहार झाले. तुरीचे व्यवहार गेल्या आठवड्यात ५००० ते ५४५० रुपये क्‍विंटलने झाले. तुरीची आवक २० क्‍विंटलची होती. या आठवड्यात तुरीचे दर ५४०० ते ५५५८ रुपये क्‍विंटलवर पोचले. या आठवड्यात आवक १७१ क्‍विंटलची असल्याचे सांगण्यात आले. 

मुगाची आवक केवळ ९ क्‍विंटलची तर दर ६००० ते ६२०० रुपयांचे होते. बाजारात संत्र्याची देखील आवक वाढती असून ती ३०२४ क्‍विंटल इतकी आहे. संत्र्याचे व्यवहार १२०० ते ३२०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. मोसंबीची आवक ५०० क्‍विंटलची असल्याचे सांगण्यात आले. मोसंबीचे व्यवहार ४०० ते ५२०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमी झाली असून ती अवघ्या १९ क्‍विंटलवर आली आहे. ४५० ते ५५० रुपये क्‍विंटल हा दर गेल्या महिनाभरापासून स्थिर आहे.

News Item ID: 
18-news_story-1573477153
Mobile Device Headline: 
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही वाढ
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi, Soybean inflows and prices rise in the Nagpur market
Author Type: 
Internal Author
विनोद इंगोले
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, बाजार समिती, agriculture Market Committee, सोयाबीन, व्यापार, महाराष्ट्र, Maharashtra, मोसंबी, Sweet lime, केळी, Banana
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment