Thursday, November 21, 2019

राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये प्रतिक्विंटल

जळगावात २२०० ते ३२०० रुपये 

जळगाव बाजार समितीत रताळ्यांची आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस आवक होते. सोमवार, गुरुवार व शनिवारी आवक होते. गुरुवारी (ता. २१) सहा क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २२०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.

आवक मध्य प्रदेश, नाशिक भागातून होते. स्थानिक भागातून कोणतीही आवक होत नसल्याची माहिती मिळाली. आवक मागील दोन-तीन महिन्यांत फारशी झालेली नसल्याचे सांगण्यात आले. 
आवक व दर (प्रतिक्विंटल, रुपयात)

सांगलीत प्रतिक्विंटल २००० ते २२०० रुपये

सांगली येथील शिवाजी मंडईत रताळीची आवक कमी झाली आहे. गुरुवारी (ता. २१) रताळीची १५ पोती (एक पोते ५० किलो) आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस २०० ते २२० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत सांगली जिल्ह्यातील मिरज, आष्टा, फाळकेवाडी, 
फार्णेवाडी, बेळगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, शाहूवाडी तालुक्यांतून रताळ्यांची आवक होते. बुधवारी (ता. २०) रताळीची २० पोत्यांची आवक झाली होती. 

रताळ्यास प्रतिदहा किलोस २२० ते २५० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. १९) रताळीची १५ पोत्यांची आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस २०० ते २२० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. १८) रताळची २५ पोत्यांची आवक झाली होती. रताळ्यास प्रतिदहा किलोस २१० ते २३० रुपये असा दर मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून रताळ्याची आवक कमी झाली असली तरी दर स्थिर आहेत. पुढील सप्ताहात आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. 

कोल्हापुरात क्विंटलला ५०० ते २५०० रुपये

कोल्हापूर  येथील बाजारसमितीत रताळ्याची दररोज शंभर पोती आवक होत आहे. रताळ्यास दहा किलोला ५० ते २५० रुपये इतका दर मिळत आहे. बाजार समितीत शाहूवाडी, चंदगड तालुक्‍यांतून रताळ्याची आवक होते. मध्यंतरीच्या पावसामुळे रताळ्याच्या आवकेत मोठी घट झाली. दिवाळीपर्यंत दररोज पाचशे ते एक हजार पोती इतकी आवक होत होती.

दिवाळीनंतर मात्र रताळ्याच्या आवकेत घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी रताळ्याची लागवड उशिरा केली आहे. ती रताळी आता बाजारात येत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर रताळ्याची आवक काही प्रमाणात वाढली आहेत. दरात दहा किलोस पन्नास रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रताळ्याची आवक तीस ते चाळीस टक्क्‍यांनी घटल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली.

नाशिकमध्ये ४००० ते ६००० रुपये

नाशिक येथील बाजार समिती आवारात येथील घाऊक व्यापाऱ्यांनी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मागणीनुसार बंगळूर, बडोदा व वाशी मार्केटमधून रताळी मागवली असून, त्यास ४००० ते ६००० असा प्रतिक्विंटल दर आहे. सर्वसाधारण दर ५००० प्रतिक्विंटल आहेत. अशी माहिती बाजार समितीतील भाजीपाला व्यापारी संजय गोहाड यांनी दिली. 

रताळ्याची मागणी नाशिक बाजार समितीत अत्यंत कमी असते. महाशिवरात्री, तसेच आषाढ एकादशी व हरितालिका या निमित्ताने उपवासासाठी मागणी अधिक असते. मात्र, दैनंदिन मागणी नसल्याने व्यापारी ठराविक काळात माल खरेदी करतात. पी.एस.जी. भाजीपाला अडतीमध्ये सध्या २० क्विंटल माल मागितला आहे. 

किरकोळ व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून एकादशी किंवा उपवासाचे दिवस पाहून विक्रीसाठी माल खरेदी केला जातो. गावठी रताळींना ग्राहकांकडून पसंती असल्याचे भाजीपाला विक्रेत्या अरुणा लांडगे यांनी सांगितले. नाशिक शहराच्या परिसरात व सटाणा तालुक्यात अनेक शेतकरी अल्प प्रमाणात रताळ्याच्या लागवडी करतात. त्यामुळे माल थेट बाजार समितीत न येता किरकोळ स्वरूपाची थेट विक्री होत असल्याचे पाहायला मिळते.

नाशिकच्या भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ भाजीपाला विक्रेते वाशी मार्केट किंवा शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्याची ६० ते ८० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत आहे. दैनंदिन किरकोळ स्वरूपात उपवासासाठी व जिम करणाऱ्या तरुणांकडून मागणी असते. दररोज १० किलोपर्यंत विक्री होत असल्याचे भाजीपाला विक्रेते संतोष देशमुख यांनी सांगितले.

सोलापुरात सर्वाधिक १५०० रुपये

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात रताळ्याची आवक अगदीच कमी राहिली. शिवाय मागणीही कमी असल्याने दर स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. रताळ्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात रताळ्याची आवक रोज झाली नाही. आठवड्यातून एखाद्या दिवशी २० ते ३० क्विंटल अशी आवक राहिली. शिवाय मागणीही जेमतेम राहिली. रताळ्याची सर्व आवक बाहेरील जिल्ह्यांतून झाली. रताळ्याला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये दर मिळाला.

या आधीच्या दोन्ही सप्ताहांत आवकच नव्हती. त्या आधी थोडीफार झाली. पण तीही आठवड्यातून १० ते २० क्विंटल अशी राहिली. त्या वेळी रताळ्याला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सर्वाधिक २००० रुपये आणि सरासरी १५०० रुपये असा दर मिळाला.

विदर्भात जानेवारीअखेरीस रताळी बाजारात 

फेब्रुवारी, मार्च महिन्यांतील महाशिवरात्रीची बाजारपेठ लक्षात घेता विदर्भातील काही गावांमधून रताळीचा पुरवठा होतो. यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश गावांचा यामध्ये समावेश आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत लागवड होते. त्यानंतर चार महिन्यांनी हे पीक काढणीस येते. जानेवारीत काढणी करुन बाजाराच्या मागणीनुसार याचा पुरवठा केला जातो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

उपवासाकरीता रताळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्येदेखील रताळीचे उत्पादन घेतले जाते सद्यःस्थितीत मात्र वन्यप्राण्यांचा त्रास वाढीस लागल्याने शेतकऱ्यांनी या पिकापासून फारकत घेतली आहे. त्यामुळे विदर्भात रताळी पिकाखालील लागवड क्षेत्रही कमी झाले आहे.

पुण्यात प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये

कार्तिक महिन्यातील भागवत एकादशी निमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२१) रताळ्याची सुमारे १ हजार २०० पोती आवक झाली होती. या वेळी दहा किलोला १२० ते १५० रुपये दर होते. अशी माहिती रताळ्यांचे आडतदार सचिन हराळे यांनी दिली.

शुक्रवारी (ता.२२) साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी एकादशी निमित्त पुणे बाजार समितीमध्ये चार पाच दिवसांपासून रताळ्याच्या आवकेला प्रारंभ झाला आहे. दररोज, सुमारे ५०० ते ८०० गोणींची आवक होत असून बुधवारी (ता.२०) सुमारे ९०० गोणी आवक झालो होती.  सलगच्या पावसामुळे रताळीच्या उत्पादन उशिराने सुरू झाल्‍याने आवक सरासरी पेक्षा मोठ्याप्रमाणावर असल्याचे हराळे यांनी सांगितले, तर रताळ्याची आळंदी परिसरातील किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

परभणीत १५०० ते १८०० रूपये

सध्या फारशी मागणी नसल्यामुळे परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक, तसेच इतर राज्यातून होणारी रताळींची फारशी आवक नाही. परिणामी दर स्थिर आहेत. 

मात्र, गत दोन आठवड्यांत रताळींची आवक झाली होती. त्यात कार्तिकी एकादशीनिमित्त रताळींना असलेल्या मागणीमुळे गुरुवारी (ता. ७) रताळींची ३० क्विंटल आवक झाली होती. रताळींना प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये दर मिळाले होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.  

गुरुवारी (ता. ७) कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून ३० क्विंटल रताळींची आवक झाली होती. त्या वेळी रताळींच्या घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला १५०० ते १८०० रुपये होते. तर किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने झाली होती. असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

नांदेड येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १४) रताळींची १० क्विंटल आवक झाली होती, असे व्यापारी हनिफ बागवान यांनी सांगितले. सध्या फारशी मागणी नसल्यामुळे स्थानिक, तसेच इतर राज्यांतून होणारी रताळींची आवक सुरू नाही. फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीनिमित्त रताळींची मागणी वाढते त्या वेळी मोठ्या प्रमाणावर आवक सुरू होते, असे फळे आणि भाजीपाला व्यापारी महासंघाचे सचिव सय्यद मुसा यांनी सांगितले.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा...

News Item ID: 
18-news_story-1574336850
Mobile Device Headline: 
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi Sweet potato rate in State is Rs 500 to 6000 per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, बाजार समिती, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, बेळगाव, कोल्हापूर, महाशिवरात्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
sweet Potato, Ekadashi, market re
Meta Description: 
Sweet potato rate in State is Rs 500 to 6000 per quintal जळगाव बाजार समितीत रताळ्यांची आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस आवक होते. सोमवार, गुरुवार व शनिवारी आवक होते. गुरुवारी (ता. २१) सहा क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २२०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.

0 comments:

Post a Comment