नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात लसूणाची आवक ३१९ क्विंटल झाली. मागील सप्ताहात लसूणाची आवक फक्त ३४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. चालू आठवड्यात आवक व दर वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक २५८७ क्विंटल झाली. बाजारभाव २००० ते ४८०० प्रतिक्विंटल होते. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. बटाट्याची ७७९० क्विंटल आवक झाली. बाजारभाव ९०० ते १७०० प्रतिक्विंटल होते. आल्याची आवक २३३ क्विंटल झाली. त्यास ५००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली व दर सर्वसाधरण राहिले. वालपापडीला प्रतिक्विंटल १७०० ते ३००० दर मिळाला; तर घेवड्याला १२५० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ७०६ क्विंटल झाली. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभावात घट झाली. लवंगी मिरचीला १३५० ते २००० तर ज्वाला मिरचीला ११७० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक ४९ क्विंटल झाली. चालू सप्ताहात वाटण्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून बाजारभाव स्थिर आहेत. त्यास ८७०० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला.

0 comments:
Post a Comment