Thursday, November 21, 2019

मस्त ना..! काबुली हरभऱ्यापासून आरोग्यदायी बटर

ब्रेड किंवा पोळीवर पसरवून बटरचे सेवन केले जाते. शहरी भागातील मार्केटमध्ये बटरला चांगली मागणी असते. बटर अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये काबुली चण्याचा वापर करता येतो. सँडविचमध्ये लावण्यासाठी एक अतिशय पौष्टिक ‘स्प्रेड’ म्हणून ‘काबुली चणा बटर’ म्हणजेच काबुली चण्यापासून तयार केले गेलेले बटर अतिशय लोकप्रिय होऊ लागले आहे. बचत गटामार्फत असे बटर तयार करून महिलांना चांगले रोजगाराचे साधन मिळू शकते.

आरोग्यासाठी फायदेशीर

  • काबुली चणा हे एक प्रकारचे कडधान्य असून यामध्ये २० टक्के प्रथिने, तसेच डाईटरी फायबर, फोलेट आणि खनिजे असतात.
  • पोषक तत्त्वे : ऊर्जा ६८८ किलो ज्यूल, कर्बोदके २७.४५ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ २.५ ग्रॅम
  • खनिजे : लोह २.९ मिलिग्रॅम, कॅल्शिअम ४९ मिलिग्रॅम, फॉस्फरस १६९ मिलिग्रॅम
  • काबुली चण्यामध्ये विरघळणारे व न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे तंतुमय घटक असल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
  • लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तक्षय, अशक्तपणा, डोकेदुखी यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते.
  • तंतुमय घटक आणि प्रथिने असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
  • काबुली चण्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्यामुळे शरीरातील इलेक्‍ट्रोलाइटचे प्रमाण समतोल राखण्यास मदत होते.  
  • रक्तदाब कमी होण्यास फायदेशीर ठरते.
  • काबुली चणा बटरच्या सेवनाने भूक लवकर शमत असून, त्यामुळे अन्नाचे सेवन आपोआपच कमी होते. याच्या सेवनाने शरीराची चयापचय शक्ती वाढते, त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.

प्रक्रिया

  • रात्रभर पाण्यामध्ये काबुली चणे (१०० ग्रॅम) भिजत ठेवावेत. भिजलेले चणे शिजेपर्यंत पाण्यामध्ये उकळून घ्यावेत. शिजलेले चणे मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावेत.
  • दुसऱ्या भांड्यामध्ये डार्क चॉकलेट (७० ग्रॅम) वितळून घ्यावे.
  • मिक्‍सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेले काबुली चणे, पिठीसाखर (६० ग्रॅम), तेल (३० ग्रॅम), वितळलेले डार्क चॉकलेट, व्हॅनिला इसेन्स (२ ते ३ थेंब) एकत्रित करून घ्यावे.
  • बारीक मिश्रण तयार होईपर्यंत सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण भांड्यामध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
  • हे बटर पोळी किंवा ब्रेडला लाऊन खाता येते.

संपर्क ः शैलेंद्र कटके, katkesd@gmail.com
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

News Item ID: 
18-news_story-1574081120
Mobile Device Headline: 
मस्त ना..! काबुली हरभऱ्यापासून आरोग्यदायी बटर
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture story in marathi, making of chana butter
Author Type: 
External Author
शैलेंद्र कटके, प्रा. डॉ. अरविंद सावते
Search Functional Tags: 
महिला, रोजगार, आरोग्य, कडधान्य, चॉकलेट, साखर
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment