Monday, December 2, 2019

देशी कोंबड्यांमधील कृमीचे नियंत्रण

कोंबड्यांमध्ये कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येणे कठीण असते. परसातील कोंबड्यांना गोलकृमी आणि पट्टकृमी यांचा प्रादुर्भाव होत असतो. ठराविक कालावधीनंतर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गोलकृमी व पट्टकृमीनाशकाची मात्रा देणे गरजेचे आहे.

परसबागेमध्ये प्रामुख्याने देशी कोंबडीचे संगोपन केले जाते. परसामध्ये मुक्त संचार करताना कोंबड्या विविध घटक खातात, त्यामुळे त्यांना अनेक परजीवींचा प्रादुर्भाव होतो. विशेषतः मातीमध्ये विकसित झालेली अस्कॅरिडीया गॅली या कृमीची अंडी व अनेक मध्यस्थ यजमानामार्फत पट्टकृमींचा प्रादुर्भाव होतो. सध्याच्या पावसाळ्यामध्ये देशी कोंबड्यांना अस्कॅरीडीया गॅली या कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. हे कृमी अत्यंत लांब (५ सें.मी.) असतात. कृमींचे वेटोळे बनते, त्यामुळे कोंबडीच्या आतड्याच्या हालचालींमध्ये बाधा येते. आतड्याच्या कार्यामध्ये अडथळा येतो. कृमीमुळे आतड्याच्या आतील आवरणास इजा पोचते आणि त्यामुळे अन्नरसाचे शोषण होत नाही. या कृमीमुळे कोंबडीच्या वजन व अंडी उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.  

उपाययोजना 

  • कोंबड्यांना कृमी नाशकाची मात्रा पाणी किंवा खाद्यामधून द्यावी.
  • एका कोंबडीला जंतनाशक औषधी देण्याचा खर्च केवळ २ ते ३ रुपये येतो.अस्कॅरीडीया गॅली या कृमीबरोबर बऱ्याच कृमींचा प्रादुर्भाव कोंबड्यांना होतो. हे लक्षात घेऊन जंतनाशकाची शिफारशीनुसार मात्रा द्यावी.  
  • विदेशी कोंबड्यांपेक्षा परसातील कोंबड्यांना गोलकृमी (अस्कॅरीडीया गॅली) आणि पट्टकृमी (रॅलीटीना) यांचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून ठराविक कालावधीनंतर गोलकृमीनाशक व पट्टकृमीनाशकांची मात्रा देणे हे आर्थिकदृष्ट्या परवडते.  
  • कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येणे कठीण असते. पट्टकृमीचे तुकडे वेळोवेळी विष्टेद्वारे बाहेर टाकले जातात. म्हणून पट्टकृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे केवळ विष्टेची तपासणी केल्यानंतरच निदर्शनास येते. 
  • कृमीच्या नियंत्रणासाठी परसामध्ये पाळलेल्या कोंबडी पिलांना १ ते ३ महिन्यांपर्यंत दोन वेळेस जंतनाशकाची मात्रा देणे गरजेचे असते. 
  • मोठ्या कोंबड्यांना विशेषतः पावसाळ्यामध्ये गोलकृमीनाशक व पट्टकृमींनाशकाची मात्रा एक ते दोन वेळेस द्यावी. यामुळे जंताचा प्रादुर्भाव कमी होऊन वजन आणि अंडी उत्पादनात वाढ होते. 
  • परसातील कोंबड्यांना कृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होतो, त्यामुळे त्यांना जंतनाशकाची मात्रा देणे गरजेचे असते.  

 - डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ 
(परजीवीशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान 
महाविद्यालय, परभणी)

News Item ID: 
18-news_story-1572427491
Mobile Device Headline: 
देशी कोंबड्यांमधील कृमीचे नियंत्रण
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, article regarding indigenous poultry breed
Author Type: 
External Author
डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. जगदीश गुडेवार
Search Functional Tags: 
कोंबडी
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment