जळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून, काढणी अनेक भागात सुरू झाली आहे. सुरवातीलाच पपईचे दर टिकून असून, शेतकऱ्यांना जागेवरच प्रतिकिलो १८ रुपयांचा दर मिळत आहे.
पपईची लागवड खानदेशात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व तळोदा भागात अधिक होते. यापाठोपाठ जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि धुळ्यातील शिरपूर, धुळे व शिंदखेडा तालुक्यातही पपईचे पीक घेतले जाते.
मागील वर्षी उन्हाळ्यात दुष्काळ भीषण होता. यामुळे पपई लागवडीवर अनेक भागात परिणाम झाला. लागवड सुमारे एक ते दीड हजार हेक्टरने कमी झाली होती. सुमारे तीन हजार हेक्टरवर पपई आहे. तापी व पांझरा, अनेर नदीच्या लाभक्षेत्रासह सातपुडा पर्वतालगतच्या भागात मात्र शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसर करून वापर करून हे पीक जगविले. आजघडीला नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यात पीक जोमात आहे. पपईची काढणी आठ दिवसांपूर्वी जोमात सुरू झाली.
खरेदीसाठी राजस्थान, मध्य प्रदेश, जळगाव जिल्ह्यातील रावेर, धुळ्यातील शिंदखेडा व नंदुरबारमधील शहादा येथील व्यापारी कार्यवाही करीत आहेत. थेट शेतात जाऊन व्यापारी खरेदी करीत आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रतिकिलो २० रुपये दर होता. सध्या प्रतिकिलो कमाल १८ रुपये दर आहे. आगाप लागवडीच्या पपई बागांमधील काढणी वेगात सुरू आहे. दोन-तीनदा आगाप पपई बागांमध्ये काढणी झाली आहे.
पपईची मागणी राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात व राज्यातही आहे. बाजार समित्यांमध्ये पपईची आवक फारशी नाही. सध्या दर्जेदार फळे निघत असून, थंडी वाढली तर मागणी आणखी वाढेल, असे शेतकरी रोहित पटेल (वडछील, जि. नंदुरबार) म्हणाले.

0 comments:
Post a Comment