Sunday, December 1, 2019

छतावरील पर्जन्यजल संचय तंत्रातून १४ लाख लिटर साठा

जालना कृषी विज्ञान केंद्राने ‘रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग’ म्हणजेच छतावरील पावसाच्या पाण्याचा संचय करणाऱ्या तंत्राची उभारणी आपल्या प्रक्षेत्रात केली आहे. गटर, चेंबर्स, पीव्हीसी व रबरी पाइप्सद्वारे
हे पाणी शेततळ्यापर्यंत पोचवले आहे. आजमितीला सुमारे ७२२ मिमी. पाऊस होऊन त्याद्वारे १४ लाख लिटर पाण्याचा साठा झाला आहे. त्यातून रोपवाटिकेतील एक लाख रोपांसाठी पुढील शंभर दिवसांसाठी पाण्याची शाश्‍वत सोय करणे शक्य झाले आहे.

शेतकरी पाणी व माती या दोन घटकांबाबत अधिक जागरूक झाले आहेत. मग पाण्याचा वापर काटेकोर असो, की त्याचे संवर्धन करणे असो, त्याविषयीचे प्रयोग करण्यात त्यांचा पुढाकार असतो.
जालना (खरपुडी) येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पाणी या विषयावर केंद्रित अनेक प्रयोग केले. पाण्याचा ताळेबंद मांडला. तो गावकऱ्यांना शिकवला. त्यातून कडवंची गाव परिसरात यशकथा घडल्या.

पाण्याचा संचय करणारे तंत्र

याच केव्हीकेने आता पावसाच्या पाण्याचा संचय करण्याबाबतही प्रत्यक्ष कृतीतून जागरूकता निर्माण
करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी ‘रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात छतावरील पावसाच्या पाण्याचा संचय असा तंत्रज्ञान प्रकल्प राबवण्यास सुरवात केली आहे. जलसंवर्धनाचा हा एक उत्तम नमुना म्हणता येतो. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींसाठी, तसेच
प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मागील वर्षी वसतिगृह बांधण्यात आले. प्रशिक्षण हॉल मात्र पूर्वीच बांधण्यात आला होता. या तीनही इमारतींच्या छतांचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौरस मीटर म्हणजे अंदाजे २२ हजार चौरस फूट आहे. तीनही इमारतींचे छत पत्र्याचे आहे. याच छताचा वापर प्रयोगात झाला.
वसतिगृह उभारण्याचे काम एका कंत्राटदाराकडे सोपवले होते. केव्हीकेचे कृषी अभियंता पंडित वासरे यांना या दरम्यान ‘रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग’ची कल्पना सुचली. ही यंत्रणा विनामूल्य उभी करण्याची त्यांनी कंत्राटदाराला विनंती केली. त्याने थोडे आढेवेढे घेतले खरे; पण हे काम अपेक्षेनुसार पूर्ण करून दिले. एक ते दोन पाऊस झाल्यानंतर झालेल्या कामांमुळे जलसंचय चांगला झाला. त्यातून शेततळे पाण्याने डबडबून गेले. वासरे यांनी कंत्राटदाराला ही बाब प्रत्यक्ष दाखवली. त्या वेळी सर्वांनाच अत्यंत आनंद झाला. मग कंत्राटदाराच्या हस्तेच शेततळ्यातील पाण्याचे पूजन करण्यात आले. यापुढील प्रत्येक कामात आपण ‘रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग’ हे तंत्र वापरणार असल्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

असे आणले शेततळ्यापर्यंत पाणी

‘वॉटर हार्वेस्टिंग’च्या प्रकल्पासाठी सुमारे ९० हजार रुपयांचा खर्च आला आहे. छताला पन्हाळी बसवली आहेत. तेथून खाली पडणारे पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी गटर बनवण्यात आली आहे.
गटरची एकूण लांबी सुमारे ९०० फूट आहे. गटरमध्ये जमा झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी पीव्हीसी पाइप्सचा वापर केला आहे. त्याद्वारे ते १५ ‘डक्ट’ किंवा चेंबरमध्ये आणून सोडले जाते.
या पाइप्सना रबरी गुंडाळी पाइप सामाईकरीत्या जोडली आहे. याच पाइपला स्थानिक भाषेत धामण पाइप असे म्हणतात. जमिनीला थोडासा उतार दिल्याने ग्रॅव्हिटी परिणाम साधून हे पाणी शेततळ्यापर्यंत आणले आहे. डक्टमधून निघणाऱ्या पाच पाइपलाइन्सची एकूण लांबी सुमारे ६०० फूट आहे.

दहा लाख लिटर पाणीसंवर्धन क्षमता

जूनमध्ये उभारण्यात आलेल्या या यंत्रणेचा परिणाम यंदाच्या पावसाळ्यात दिसून आला. केव्हीकेने बोअरचे पाणी साठविण्यासाठी व ते रोपवाटिकेला देण्यासाठी चार वर्षांपूर्वी ३० बाय १५ बाय ४ मीटर आकारामानाचे शेततळे खोदून त्याला अस्तरीकरण केले होते. या शेततळ्याची क्षमता सुमारे १५ लाख लिटर पाणी साठविण्याची आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत येथे सुमारे ५०० मिलिमीटर पाऊस झाला. त्याद्वारे सुमारे १० लाख लिटर पाणी ‘रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे शेततळ्यात जमा करण्यात आले.

एक लाख रोपांना होतेय सिंचन

ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत सुमारे ७२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, त्यानुसार साठ्यात वाढ होऊन तो १४ लाख लिटरपर्यंत पोचला. रोपवाटिकेत सध्या सुमारे एक लाख रोपे आहेत. चिकू, डाळिंब, पेरू, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांबरोबर वनवृक्षांची रोपेही येथे तयार केली जातात. या रोपांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी असते. ‘वॉटर हार्वेस्टिंग’ तंत्राचा उपयोग या सर्व रोपांना सिंचन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पुढील सुमारे शंभर दिवसांसाठी पाण्याची शाश्‍वती या रोपांसाठी तयार झाली आहे. शेततळे पूर्ण क्षमतेने भरल्यास त्यातील पाणी त्याहून अजून दिवसांसाठी उपयोगात
येणार आहे.

शेतकऱ्यांत जलसंचय तंत्राबाबत जागृती

वास्तविक पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग व्हावा व शेतकऱ्यांनाही त्याचे अनुकरण करण्यासाठी प्रेरणा मिळावी हाच आमच्या प्रयोगाचा हेतू असल्याचे केव्हीकेचे कृषी अभियंता पंडित वासरे यांनी सांगितले. या तंत्राद्वारे किती मोठ्या प्रमाणात पाणी जमा केले जाऊ शकते, हे शेतकऱ्यांच्या लक्षात यावे यासाठी एक प्रात्यक्षिक केले आहे. त्यासाठी शेततळ्यापासून सुमारे शंभर फुटांपर्यंत पारदर्शक पाइप्स जमिनीत न गाडता पीव्हीसी पाइपलाइनला जोडल्या आहेत. जेव्हा पाऊस
चांगला पडतो तेव्हा या पाइप्स भरभरून वाहतात. त्या पारदर्शक असल्याने किती मोठ्या प्रमाणात पाणी येते याचा शेतकऱ्यांना अंदाज येतो. केव्हीकेतर्फे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेस होणाऱ्या बैठकीद्वारे, तसेच आंतरराष्ट्रीय खत दिनाद्वारेही या तंत्राचा प्रसार शेतकऱ्यांत करण्यात आला आहे.

बोअरचे पुनर्भरण

या तंत्राच्या वापराने चांगला पाऊस असेल तर शेततळे लवकर भरेलच. मात्र, ते भरल्यानंतर ओव्हरफ्लो होणारे पाणी शेततळ्याखाली असलेल्या बोअरच्या बाजूस २० बाय २९ फुटांचा खड्डा खोदून त्यात सोडण्याची सोय केली आहे. यामुळे बोअरचेही पुनर्भरण होणार आहे.

‘रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग’ तंत्र - ठळक बाबी

  • पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी छताचे क्षेत्रफळ - २००० चौमी.
  • ऑक्टोबरअखेरपर्यंत पडलेला पाऊस - ५०० मिमी.
  • शेततळ्यात जमा झालेले पाणी - १४ लाख लिटर
  • सुमारे एक लाख रोपांना होणारा सिंचन कालावधी - १०० दिवस
  • शेततळे पूर्ण क्षमतेने भरल्यास हा सिंचन कालावधी सुमारे १५० ते १८० दिवस
  • तंत्र उभारणीसाठी आलेला खर्च - ९० हजार रु.

आमचे कृषी विज्ञान केंद्र असलेली जमीन खडकाळ आहे. येथे पाण्याची नेहमी टंचाई असते. पाणी उपलब्धतेसाठी आम्हाला सतत विविध उपाययोजना करून काटकसरीने त्याचा वापर करावा लागतो.
त्या गरजेतूनच ‘रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग’ची कल्पना सुचली. त्याचा फायदा होत आहे.
संपर्क - पंडित वासरे - ९४२२७०१०६५
कृषी अभियंता, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी

(लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

News Item ID: 
18-news_story-1572776015
Mobile Device Headline: 
छतावरील पर्जन्यजल संचय तंत्रातून १४ लाख लिटर साठा
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture stories in marathi technowon roof top water harvesting in kvk jalana
Author Type: 
External Author
डॉ. टी. एस. मोटे
Search Functional Tags: 
पाणी, Water, ऊस, पाऊस, विषय, Topics, पुढाकार, Initiatives, प्रशिक्षण, Training, शेततळे, Farm Pond, मात, mate, डाळ, वर्षा, Varsha, सिंचन, डाळिंब, लिंबू, Lemon, खत, Fertiliser, लेखक, औरंगाबाद, Aurangabad
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment