सातारा : जिल्ह्यातील जावळी तालुका हा नैसर्गिक संसधानाने नटलेला डोंगरी तालुका असून अति पर्जन्यमान असलेल्या भागात अल्पभूधारक पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती केली. जाते. पावसाळ्यात संततधार पाऊस तर उन्हाळ्यात टंचाई जाणवत असल्याने बागायती पिके कमी प्रमाणात असतात. या तालुक्यातील शेतजमिनीचे क्षेत्र कमी असल्याने अल्पभूधारकांची संख्या मोठी असून पूर्वी शेती उत्पादन कमी असल्याने नोकरीच्या निमित्ताने अनेक जणांनी मुंबईचा रस्ता धरला होता. या तालुक्यात माथाडी कामागारांचे जाळे मोठे आहे.
''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
पिक प्रात्यक्षिकातील भात पिक
या तालुक्याच्या शेजारी महाबळेश्वर तालुका आहे. या तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणी ही राष्ट्रीय दर्जाची पर्यटने केंद्रे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात येतात. महाबळेश्वर जाण्याच्या एक प्रमुख जावळी तालुक्यातून जातो. महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पिक जात होते. त्यामुळे 1990 च्या दरम्यान जावली तालुक्यात या पिक घेण्यास सुरूवात झाली. बघता बघता जावळी तालुक्यातील स्ट्रॉबेरी प्रमुख पिकांपैकी एक झाली. महाबळेश्वर, पाचगणी शहरात पर्यटकांची संख्या मोठी असल्याने तेथील स्ट्रॉबेरी जशी विक्री होत होती. त्यापद्धतीने जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांची होत नव्हती. ही समस्या जाणून श्रमिक जनता विकास संस्था भागामध्ये शेतीविषयक कार्यक्रम राबवत होते. गावपातळीवर अडी अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी विविध गावातील प्रतिनिधी (सध्याच्या वेण्णा वॅलीचे संचालक) नेमून वेण्णा सेंद्रीय शेती उत्पादन व पुरवठा सह संस्था निर्माण केली.
या संस्थेकडून सेंद्रीय शेतीस प्रोत्साहान, प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, पडीक जमिनीचे पुर्नजीवन करण्यास प्रयत्न करणे, अडी अडचणीनी सोडविणे यावर भर दिला. उत्पादीत भाजीपाला, फरस-बी, झुकेनी यासाठी दळणवळण सुरू करून मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत पाठविली जाऊ लागली. संघटीत होऊन शेती केल्यास फायदेशीर होत आहे हे लक्षात येऊ लागले. यामुळे गावागावात शेतकरी पुरूष गटाची स्थापना करण्यात आल्या. संघटनाबरोबरच बचतीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. या होणाऱ्या बचतीत भांडवलास मदत होऊ लागली. या दरम्यान शेतकऱ्यांची कंपनी केल्यास शेतकऱ्यांना मार्केटला विक्री करणे सोपे जाईल असा विचार पुढे आला. कृषी विभागाकडून कंपनीचे फायदे शेतकऱ्यांच्या कानावर जाऊ लागले.
वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचा श्रीगणेशा
श्रमिक जनता विकास संस्था व वेण्णा सेंद्रीय शेती सहकारी संस्थेच्या सभासदांनी शेतकरी प्रोड्युसर कंपनी करण्याचा विचार पुढे आला. श्रमित जनता संस्थेकडून वेण्णा सेंद्रीय संस्थेत काम करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित केले. श्रमिक जनता विकासचे संस्थापक अदिनाथ ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यातील वेगवेगळ्या 13 गावातील 13 सदस्याची निवड करून 2015 मध्ये जागतिक बॅंक अर्थसाय्यित कृषि तंत्रज्ञाऩ व्यवस्थापन, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पातंर्गत वेण्णा व्हॅली ऍग्रो प्रोड्युसर या शेतकऱ्याच्या कंपनीची स्थापना झाली.
कंपनीच्या अध्यक्षपदी राघव बिरामणे, उपाध्यक्षपदी जगन्नाथ जाधव व सचिवपदी सुनिल गोळे यांची निवड करण्यात आली. परिसरात कार्यरत असलेल्या 35 शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना सामावून घेत त्यांना सभासद केले. इतर इच्छूक शेतकऱ्यांचा कंपनीत सभासद करून घेतले. सध्या कंपनीत 500 च्या दरम्यान सभासद संख्या आहे.
शासनाकडून 13 लाख 50 हजाराचे अनुदान मिळाले आहे. यातून शेड उभारणी करून भात काढण्याची राईस मिल खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालास बाजारपेठ व योग्य दर मिळवून देणे, सेंद्रीय शेती उत्पादनात वाढ करणे, कंपनी मार्फत शेतकऱ्यांसाठी औजार बॅंक तयार करणे, कृषी गटांना प्रक्रिया उद्योगातून पुढे आणणे, शासकीय योजना जास्ती जास्त शेतकऱ्यापर्यत पोचविणे हे उद्देश पुढे ठेवून कंपनीचे कामकाज सुरू केले.
कंपनीचे कार्यालय व राईस मिल
स्ट्रॉबेरी लागवड
महाबळेश्वर तालुक्याप्रमाणे जावळी तालुका वातावरण आहे. यामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. कंपनीतील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात करतात. स्ट्रॉबेरीची रोपे तयार करण्यासाठी मदर प्लॅट हे परदेशातून आयात केले जातात. या मदर प्लॅटपासून रोपे निर्मिती झाल्यावर लागवड केली जाते. कंपनी स्थापन अगोदर शेतकऱ्यांकडून मदर प्लॅट आणले जात होते. मात्र या काळात रोपाचा दर्जा तसेच दरातही फसवणूक होण्याचा धोका होता.
यासाठी कंपनीच्या माध्यमातून मदर प्लॅटची खरेदी करण्यास सुरवात करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात तसेच मागणी प्रमाणे वाण्याची व उत्तम दर्जाचे मदर प्लॅटची मिळू लागले. तयार होणाऱ्या रोपे लागवडीसाठी ठेवून शिल्लक रोपाची विक्री केली जाते. सध्या कंपनीतील शंभरवर सभासद स्ट्रॉबेरीची लागवड करतात. स्ट्रॉबेरी उत्पादन चांगले भेटावे यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतली जातात. सेंद्रीय स्ट्रॉबेरी निर्मिती करावी यासाठी प्रोत्साहान कंपनीकडून दिले जाते.
शेतकरी उत्पादनवाढीसाठी कंपनीकडून प्रशिक्षण,चर्चासत्राचे भरविले जाते.
कंपनीच्या माध्यमातून विक्री
येथील शेतकरी सुरूवातीच्या काळात निर्मिती केलेली स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर, पाचगणी शहरात जाऊन विक्री करावी लागत होती. यामुळे उत्पादनही मर्यादीत तसेच दरही कमी मिळत होता. खासकरून सी दर्जाच्या (प्रक्रियेला जाणाऱ्या) स्ट्रॉबेरीस मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याबरोबरच पैसे बुडविले जात होते. मात्र, कंपनी स्थापनेनंतर यावर आळा घालण्यात आला आहे. बागेत सुरवातीस तयार होणारी फ्रेश स्ट्रॉबेरी विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जाते. व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावार बोलावून घेऊन दराची निश्चिती केली जाते. किलोला 100 पासून 300 रुपये पर्यत दर मिळाला आहे. तसेच काही स्ट्रॉबेरी पुणे, मुंबई शहरात कंपनीच्या माध्यमातून पाठविली जाते.
यामुळे चांगला मिळण्यास मदत होते. तसेच हंगामाच्या अंतिम टप्याता होणारी स्ट्रॉबेरी चांगला दरासाठी सर्व स्ट्रॉबेरी गोळा करून ती प्रक्रिया करणाऱ्या मॉप्रो, कृषिमित्र आदी कंपनीस पाठवला जातो. कंपन्यांना बल्कमध्ये स्ट्रॉबेरी मिळत असल्याने वाढीव दर दिला जातो. पुर्वीच्या तुलनेत प्रक्रियेला जाणाऱ्या स्ट्रॉबेरी 20 टक्के अधिक दर मिळवून दिला असून एकरकमी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. या कामाच्या मोबादल्यात कंपनीकडून फी आकारली जाते.
स्ट्रॉबेरी नर्सरी
वेण्णा व्हॅलीकडून स्ट्रॉबेरीच्या शेतीबरोबरच स्ट्रॉबेरी नर्सरीचाही व्यवसाय मिळवून दिला आहे. या व्यवसायात संस्थेतील 125 च्या सभासदांनी स्ट्रॉबेरी नसर्री व्यवसाय हंगामी केला जातो. कंपनीच्या माध्यमातून सभासदांना 65 हजार मदर प्लॅट देण्यात आले आहेत. या मदर प्लॉट पासून रोपाची निर्मिती करून ती रोपे शेतकऱ्यांना विक्री केली जातात.
महाबळेश्वर भागात जास्त पाऊस असल्याने इकडे रोपे तयार करणे शक्य नसते. तसचे इतर काही तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. मात्र रोपे तयार केले जात नाही. या शेतकऱ्यांना कंपनीच्या माध्यमातून सभासदांनी तयार केलेली रोपांची विक्री केली जाते. हा व्यवसाय साधारणपणे ती महिने शेतकऱ्यांना मिळतो. 25 हजार रोपांची नर्सरी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना 80 हजारापासून एका लाखापर्यत तीन महिन्यांत पैसे मिळतात.
भाताचे कांडून व विक्री
कंपनी कार्यक्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे भात हे खरिपातील प्रमुख पिक आहे. यामुळे या परिसरात सर्वाधिक इंद्रायणी वाणाचे भात पिक केले जाते. मात्र, भात पिकांकडे व्यावसायिक पिक म्हणून बघितले जात नसल्याने अपेक्षित फायदा मिळत नव्हता. यावर कंपनीने गेल्या दोन वर्षापासून अधिक काम सुरू केले आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून भातास कमी खाताचा वापर करून जास्तीजास्त सेंद्रीय भात तयार केला जात आहे. कंपनीच्या अगोदर व्यापारी जुन्या मापावर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांची वजनात फसवणूक केली जात होती. गरजेने विक्री होत असल्याने दरातही पिळवणूक केली जात होती. साध्या गिरणीमध्ये भात काडण्यांमुळे भाताचा तुकडा होत असल्याने दर कमी मिळत होता. यावर उपाय कंपनीने लागवडीपासून काळजी घेण्यात सुरूवात केली.
इंद्रायणी वाणाचे विद्यापीठ सर्टीफायइड बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना दिले होते. या बियाण्याची लागवड झाल्याने उत्पादनात सुधारणा झाली आहे. तांदुळ अखा तयार मिळण्यासाठी स्वताच्या इमारतीत कंपनीने राईस मिल बसविली आहे. गतवर्षी उत्पादीत झालेल्या भाताची या राईस मिलमध्ये सभासदाचा नुसत्या भातापासून मिळणाऱ्या भुस्यावर कांडून म्हणजेच अगदी मोफत दिले आहे. यातून तयार झालेल्या तांदळाच्या विक्रीसाठी प्रयत्न केले जात आहे. सभासदाचा तयार झालेला तांदुळ कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या प्रदर्शनास स्टॉलवर विक्रीसाठी ठेवला जात आहे. गेल्या दोन महिन्यात पाच टनापेक्षा अधिक तांदळाची विक्री केली आहे. शेतकऱ्यांना पुर्वीच्या तुलनेत क्विंटलला 200 रुपये अधिक मिळून वजनातील तसेच पैसे बुडण्याची भिती बंद झाली आहे. सध्या सातारा, पुणे या शहरात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना 55 ते 60 रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे. पुढीलवर्षी 20 टनापेक्षा अधिक विक्रीचे उद्दिष्टे असून मुंबईसह इतर शहरात पाठवला जाणार आहे.
वैशिष्ट्ये
कंपनीतील शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग करावा यासाठी चालना दिली जात आहे. यामध्ये श्री गणेश शेतकरी बचत गट मशरूम, माऊली शेतकरी बचत गट लोणचे, श्रमिक श्वेत क्रांती बचत गटाकडून रानभाज्या, पनीर निर्मिती केली जात आहे. यांची विक्री कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे.
कंपनी मार्फत कार्यक्षेत्रातील पडीक जमीनीचा अभ्यास करून कृषि बचत गटाच्या माध्यमातून आंबा लागवड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरिव वाढ होण्यासाठी पिकनिहाय प्रशिक्षणे तसेच कृषि विभागाच्या माध्यमातून पिक प्रात्यक्षिके घेतली जातात.
कंपनीतील शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा जास्ती जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केल्याने अनेक शेतकऱ्यांकडे औजारे आली आहेत.
शेतकऱ्याच्या शेतमाल खरेदी करून त्याची विक्री केल्याने जास्त दर मिळत आहे.
कंपनी मार्फत बि-बियाणे, स्ट्रॉबेरी मदर प्लॅट दर्जेदार उपलब्ध करून दिली जात असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास चांगला दर आणि उत्पादीत मालास बाजारपेठ मिळवून देण्याचा कंपनीचा मुळ उद्देश आहे. कंपनीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी व भात विक्रीस चांगला दर मिळत आहे. पुढील काळात 20 टन तादुंळ विक्रीचे लक्ष्य आहे. त्याबरोबर सेंद्रीय शेतमाल निर्मीती व विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत.
राघव बिरामणे, अध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी
कंपनीत बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने औजारे खरेदी करणे शक्य नसते. यासाठी कंपनीची औजारे बॅंक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सभासद तसेच शेतकऱ्यांचा तयार होणाऱ्या तादळांचा कंपनीच्या माध्यमातून ब्रॅन्ड बाजारपेठेत आणणार आहे.
जगन्नाथ जाधव, उपाध्यक्ष वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी.
कंपनीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांना चांगला दराबरोबर फसवणूक टळली आहे. सर्व सभासदाचे हित तसेत सर्वाना बरोबर घेऊन पुढील काळात कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर दिला जाणार आहे.
सुनिल गोळे, सचिव वेण्णा वॅली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी.
संपर्क - 9604515314

0 comments:
Post a Comment