सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबांच्या आवकेत काहीसा चढ-उतार राहिला. द्राक्षाची आवकही या सप्ताहात बऱ्यापैकी राहिली. या दोन्ही फळांच्या मागणीत सातत्य राहिल्याने त्यांचे दर पुन्हा टिकून आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबांची आवक प्रतिदिन एक ते दीड टनापर्यंत राहिली. ती आवक मुख्यतः सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ भागांतून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्याला मागणीही आहे. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये इतका दर मिळाला.
द्राक्षाची आवकही या सप्ताहात चांगली झाली. ती सर्वाधिक स्थानिक भागातूनच बार्शी, पंढरपूर भागांतून झाली. प्रतिदिन ४०० ते ५०० क्विंटलपर्यंत ही आवक राहिली. पण, द्राक्षाला मागणी असल्याने दर मिळाला. द्राक्षाला चार किलोच्या पेटीला किमान ५० रुपये, सरासरी ७५ रुपये आणि सर्वाधिक १०० रुपये असा दर मिळाला.
त्याशिवाय बोर आणि लिंबालाही चांगला उठाव या सप्ताहात मिळाला. बोरांची आवक प्रतिदिन प्रत्येकी ५०० ते ९०० क्विंटलपर्यंत राहिली. बोराला क्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये दर मिळाला, तर लिंबाची आवक प्रतिदिन २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. लिंबाला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा राहिला.
कांद्यासह भाज्यांचे दर स्थिर
गेल्या काही दिवसांपासून कांद्यासह शेपू, कोथिंबिर, मेथी या भाजीपाल्यांचे दर काहीसे स्थिर आहेत. या सप्ताहात कांद्याची आवक लक्षणीय वाढली. जिल्ह्यासह बाहेरूनही कांद्याची आवक वाढली. प्रतिदिन २०० ते ३०० गाड्यापर्यंत ही आवक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. तर भाज्यांची आवकही ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत राहिली. पण, त्याला फारसा उठाव नसल्याने भाज्यांचे दरही स्थिर राहिले. भाज्यांना प्रत्येकी २०० ते ३०० रुपये असाच दर या सप्ताहातही कायम राहिला.

0 comments:
Post a Comment