माळेगाव - दुष्काळी पार्श्वभूमी व चोपन जमिनीतून शेतकऱ्यांना बांबू शेतीचा सक्षम पर्याय पुढे आला आहे. शाश्वत पैसे मिळवून देणाऱ्या बांबू पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बारामती बारामती कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेतला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बांबू शेती आपल्याकडे जरी नवीन असली, तरी पडीक चोपण जमिनी, कमी पाणी व कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू देणारा नवा पर्याय शेतकऱ्यांपुढे आला आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही ‘अटल बांबू समृद्धी योजना’ सुरू केली असून, त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी आगामी कृषिक प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
Video : स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार इंटरनॅशनल फेस्टिव्हल!
बारामती-शारदानगर येथे १६ जानेवारी रोजी कृषिक प्रदर्शनाला सुरुवात होत आहे. प्रदर्शनात बांबू शेती हा महत्त्वपूर्ण घटक असून बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या विविध शोभेच्या वस्तू, फर्निचर व खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शनामध्ये स्वतंत्र दालन असणार आहे. तसेच येथे प्रदेशनिहाय बांबूच्या वेगवेगळ्या जाती व लागवडीसंदर्भात तज्ज्ञांकडून संपूर्ण शास्त्रीय मार्गदर्शन केले जाणार आहे.
पिंपरी चिंचवडकरांसाठी खूशखबर; मिळकतकरांविषयी महापालिकेचा मोठा निर्णय
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीर अली म्हणाले, ‘‘जंगल तोड पूर्णतः थांबविण्याचा सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहे. परिणामी पेपर फॅक्टरींना लागणारे कच्चा माल मिळत नाही, अशा प्राप्त स्थितीत बांधू शेतीचा पर्याय उत्तम ठरतो. दुष्काळी पार्श्वभूमी व चोपन जमिनीचा वापर बांबू शेतीसाठी केल्यास शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. तीन वर्षांत हे पीक तयार होते. या उद्देशाने सरकारची अटल बांबू समृद्धी योजना सुरू झाली आहे. या योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे.’’
दरम्यान, अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत टिश्यू कल्चर बांबू रोपांचा शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पुरवठा होणार आहे. शेतकऱ्यांना लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून दिल्यास यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. तसेच बांबू लागवडी खालच्या क्षेत्राची प्रतसुद्धा सुधारते. टिश्यू कल्चर बांबू रोपांची लागवड अधिक उत्पादन मिळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. टिश्यू कल्चर पद्धतीने रोपे निर्माण केल्याने एका कंदापासून जास्ती जास्त रोपे मिळतात. या कामी येथील कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना बांबू रोपे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

0 comments:
Post a Comment