हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते. हेलिकोनियाच्या फुलांची वेस लाइफ चांगली असून, सजावटीसाठी किंवा मोठ्या फुलदानीत ठेवण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो, तर पानांचा वापर शोभेसाठी केला जातो.
हेलिकोनिया ही वनस्पती काटक आणि झपाट्याने वाढणारी असून, सुमारे दोन मीटर उंच वाढते. पानांच्या आतील भागांमध्ये तपकिरी रंगाची पाने असतात. फुले मोठी आणि पाने वरती सरळ येतात. फुले दांड्यावर लांब अंतरावर येतात. हेलिकोनिया हे अतिशय सुंदर आकर्षक लांब दांडीचे फूल (कट फ्लावर) असून, एकच सरळ फुलं फक्त एकदाच येतात. भारतात हेलिकोनियाच्या जवळपास १०० जाती सापडतात.
- शास्त्रीय नावः हेलिकॉइड ऑरेंज रेड येलो
- मराठी नावः हेलिकोनिया
- वर्गः झुडूपवर्गीय
- कुटुंबः मुसासी किंवा केळी कुटुंब
- फुलांचा हंगाम: वर्षभर
- फुलांचा रंग: लाल, पिवळा
- पानेः हिरवी
- वनस्पती उंची किंवा लांबीः १ ते २ मीटर
- रुंदीः १ ते २ मीटर
- झाडाची वाढः सरळ किंवा पसरट
हवामान व माती
- ही उष्णकटिबंधीय वनस्पती असून, वाढीसाठी उबदार आणि आर्द्र तापमान मानवते. सूर्यप्रकाशात उत्तम प्रकारे वाढते.
- लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन लागते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ दरम्यान असावा.
- या पिकाला सूर्यप्रकाश आवश्यक असला तरी कोरड्या भागात ते सावलीत पीक घेतले जाऊ शकते. उत्पादन व गुणवत्ता यासाठी तापमान फार महत्त्वाचे कार्य करते. वाढीसाठी २१ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
लागवड
- लागवड वर्षभर केव्हाही करता येते. कंद लावून लागवड केली जाते. ४५ सेंमी रुंद, २५ सेंमी खोलीचे खड्डे घेऊन १.२ × १.२ मी वर लागवड करावी.
पाणी व खत व्यवस्थापन
- पाणी व खतांची उपलब्धता आवश्यक असून, लागवडीच्या वेळी २ किलो चांगले कुजलेले शेंणखत द्यावे. फूल लागण्याच्या वेळी प्रति झाड ३० ग्रॅम युरिया खताची मात्रा द्यावी.
- जमीन ओलसर राहील याची काळजी घ्यावी. पुरेसे पाणी देऊन पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा करावा.
उत्पादन
- फुले येण्यासाठी लागवडीपासून ७ ते ८ महिन्याचा कालावधी लागतो. वर्षभर फुले येतात. पावसाळ्यात फुलांचे प्रमाण जास्त असते.
- प्रत्येक फांदीला एकच फूल येते. त्यानंतर ते वाळून जाते. फुलांचा आकार वनस्पतीच्या जोमावर अवलंबून असतो.
- तोडणी करताना धारदार चाकूचा किंवा विळ्याचा वापर करावा. फुले पूर्ण पानासहित खालून कापावीत. साधारण ३० ते ४० फुले एका खोडापासून मिळतात.
संपर्कः भूषण तायडे, ९७६६८०८३२४
(के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

0 comments:
Post a Comment