तीव्र सूर्यप्रकाशापासून घडाचे संरक्षण करण्यासाठी घड पॉलिप्रोपॅलीन ची पिशवी किंवा केळीच्या वाळलेल्या निरोगी पानांनी झाकावेत. पक्वतेच्या अवस्थेतील घडांना आधार देणे आवश्यक असते. त्यासाठी घडांना बाबूंचा किंवा पॉलीप्रोपॅलीन पट्ट्यांचे आधार द्याव्यात.
पाण्याच्या बाबतीत केळी पीक अत्यंत संवेदनशील असते. एकूण पीक कालावधीत केळीला १६०० ते २००० मिली.मी. पाण्याची आवश्यकता असते.
जळगाव केळी संशोधन केंद्राने मृगबागेस दररोज ठिबक सिंचन पद्धतीने मार्च महिन्यात १६ ते १८ लिटर, एप्रिल महिन्यात १८ ते २० लिटर आणि मे महिन्यात २० ते २२ लिटर पाणी प्रति झाड देण्याची शिफारस केली आहे. कांदेबागेस या तीन महिन्यांमध्ये दररोज प्रति झाडांस १० ते १४ लिटर पाणी द्यावे.
- शिफारशीनुसार उन्हाळ्यात केळी पिकाला घड निसवण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या मृग बागेस हजार झाडांसाठी प्रति आठवडा ५.५ किलो युरिया आणि ७ किलो म्युरेट ऑफ पोटॉश द्यावा. तर मुख्य वाढीच्या अवस्थेतील कांदेबागेस १३ किलो युरिया आणि ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवड्याला सिंचनाच्या पाण्यातून देण्याची शिफारस केली आहे.
घडांची काळजी
- उन्हाळ्यात मृग बागेतील केळी घड निसवण्याच्या व घड पक्वतेच्या अवस्थतेत असतात. घड पूर्ण निसवल्यानंतर तसेच केळ कमळ तोडल्यानंतर ५० ग्रॅम पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात स्टीकरसह मिसळून घडावर फवारणी करावी. यामुळे घडातील केळीची जाडी व लांबी वाढून घडाच्या वजनामध्ये वाढ होते.
- तीव्र सूर्यप्रकाशापासून घडाचे संरक्षण करण्यासाठी घड पॉलिप्रोपॅलीन ची पिशवी किंवा केळीच्या वाळलेल्या निरोगी पानांनी झाकावेत.
- पक्वतेच्या अवस्थेतील घडांना आधार देणे आवश्यक असते. त्यासाठी घडांना बाबूंचा किंवा पॉलीप्रोपॅलीन पट्ट्यांचे आधार द्याव्यात.
आच्छादनाचे महत्त्व
- उन्हाळ्यात वातावरणातील तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जमिनीतील पाण्याचा अंश झपाट्याने खालवतो. त्यामुळे उन्हाळ्यात केळी बागेला आच्छादन देणे आवश्यक असते.
- जळगाव केळी संशोधन केंद्रामध्ये घेतलेल्या प्रयोगाअंती ३० मायक्रॉन जाड चंदेरी किंवा काळा रंगाच्या पॉलीइथिलीन कापडाचा आच्छादनासाठी वापर फायदेशीर असल्याचे निदर्शनास आले. हे कापड मृगबागेमध्ये केळीच्या दोन ओळीतील मोकळ्या जागेत नोव्हेंबर महिन्यापासून टाकण्यात यावे. या आच्छादनाच्या वापरामुळे जमिनीचे तापमान थंडीत टिकून राहते तर उन्हाळ्यात वातावरणातील तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी राहते. बाष्पीभवनाच्या वेग मंदावतो व जमिनीतील पाण्याचा अंश टिकून राहतो. घड सटकणे व झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण कमी होते. तणांचा बंदोबस्त होतो.
- पॉलिथीनच्या कापडाचे आच्छादन देणे शक्य नसल्यास बागेमध्ये ऊसाचे पाचट, गहू किंवा सोयाबीन चा भूसा यांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो.
बाष्पीरोधकाचा केळी बागेमध्ये वापर
- पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या वेग नियंत्रित करण्यासाठी उन्हाळ्यात केओलीन या बाष्परोधक पावडरची ८० ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. या फवारणीमुळे केळीच्या पानावर पांढरा थर तयार होतो. हा थर पानांतील छिंद्राना अंशतः बंद करतो.
गारपीटग्रस्त केळीबागेचे व्यवस्थापन
- सर्वप्रथम गारपिटीग्रस्त उन्मळून पडलेली केळीची झाडे बागे बाहेर काढावीत.
- विक्री योग्य घडांची त्वरित कापणी करून विक्री करावी.
- सहा महिन्यांची उभ्या झाडांची सर्व पाने पूर्णपणे फाटली असल्यास, अशी झाडे कापून टाकावीत.
- घड निसवण होऊन दोन महिने झालेल्या झाडांची पाने पूर्ण फाटून गेली असल्यास, अशा घडांना पक्वतेसाठी फक्त पाण्याची गरज असते. त्यामुळे अशा झाडांचे योग्य पाणी व्यवस्थापन करावे.
- संपूर्ण बागेतील झाडांची पाने फाटून गेली असल्यास, अशा झाडांचे योग्य पोषण करून जोमदार फुटव्यांना वाढवून पहिले खोड पीक घ्यावे.
- गारपिटीमुळे झाडाच्या पाने, खोड व घडावर जखमांवर होतात. या जखमांतून बुरशीन तसेच जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- नियंत्रणासाठी मॅँकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून स्टिकरसह आलटून पालटून फवारणी करावी.
संपर्कः ०२५७-२२५०९८६
(केळी संशोधन केंद्र, जळगाव)

0 comments:
Post a Comment