सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे वळत असल्याचे दिसते. या उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे पूर्वमिश्रण (प्रिमिक्स) या तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. प्रिमिक्स किंवा रेडी टू ईट (खाण्यासाठी तयार खाद्यपदार्थ) तयार करणे अत्यंत सोपे असून, या तंत्रज्ञानाद्वारे विविध खाद्यपदार्थ तयार करता येतात.
बाजारामध्ये नूडल्स, केक, विविध सूप, सुगंधी दूध इत्यादी पदार्थ बनविण्यासाठी लागणारे प्रिमिक्स उपलब्ध आहेत. या तयार प्रिमिक्सपासून सहजरीत्या आणि जलद खाद्यपदार्थ बनवता येतात.
प्रिमिक्स बनविण्याची प्रक्रिया
- या प्रक्रियेमध्ये उत्पादनांची गुणवत्ता, प्रत व कणांचा आकार या बाबी महत्त्वाच्या आहेत. यावरच उत्पादनाची चव, रंग आणि दर्जा अवलंबून असतो.
- या प्रक्रियेत दळण्याच्या क्रियेद्वारे कच्या मालाचे रूपांतर बारीक कणांमध्ये केले जाते. हे लहान झालेले कण एका विशिष्ट चाळणीमधून चाळून घेतले जातात. यामुळे सगळे कण एकसमान आकारात उपलब्ध होतात.
- हे सर्व कण एका स्टीलच्या ट्रे मध्ये दीड ते दोन इंच पर्यंत पसरून घ्यावे. असे सर्व ट्रे भरून ते ड्रायर (हॉट एअर ओव्हन) मध्ये ठेवावेत. ट्रे ड्रायरमध्ये ८० ते ११० अंश सेल्सिअस तापमानाला ४ ते ६ तास निर्जलीकरणासाठी ठेवावे. जेणेकरून कणांची आर्द्रता ५ ते ७ टक्के पर्यंत येते. यामुळे उत्पादनाची साठवण क्षमता वाढून उत्तम चव मिळते.|
- ट्रे ड्रायरमधून बाहेर काढून सामान्य तापमानाला ४ ते ५ तास थंड होण्यास ठेवावे. अशा सर्व महत्त्वाच्या घटकांचे मिश्रण करून ते प्रक्रियेसाठी तयार करून घ्यावेत.
- सर्व तयार साहित्य एकत्रित मिसळून घ्यावे. हे मिश्रण प्लॅनेटरी मिक्सरमधून १५ ते २० मिनिटे व्यवस्थित मिसळून घ्यावे. अशा रीतीने प्रिमिक्स मिश्रण तयार होते. तयार प्रिमिक्स मिश्रणास बाजारातील मागणीनुसार विविध आकाराच्या पाऊचमध्ये भरले जाते.
प्रायमरी पाउच
- पाउचिंग मशीनच्या साह्याने विविध आकारातील पाऊच तयार करण्याच्या प्रक्रियेला ‘प्रायमरी पाउचिंग’ असे म्हणतात.
- पाउच वर उत्पादनाबद्दल सर्व माहिती म्हणजेच उत्पादनामध्ये असलेले घटक, शाकाहारी किंवा मांसाहारी लोगो, कंपनीचे नाव, पत्ता, एफएसएसएआयचे प्रमाणपत्र, उत्पादन तयार झाल्याची दिनांक, वापरण्याची शेवटची दिनांक, उत्पादनातील पौष्टिक घटक, विक्री किंमत इत्यादी गोष्टी छापणे आवश्यक असते.
प्रिमिक्स उत्पादन प्रक्रिया
कच्चा माल
l (प्रयोगशाळेतील तपासणी)
खडे वेगळे करणे
l
दळण्याची क्रिया
l
निर्जलीकरण (८० ते ११० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ४ ते ६ तास ठेवणे)
l
मिसळण्याची क्रिया
l (प्रयोगशाळेतील तपासणी)
पाउचिंग (प्रायमरी पॅकिंग)
l (प्रयोगशाळेतील तपासणी)
सेकंडरी पॅकिंग
l
कोरूगेटेड बॉक्स पॅकिंग
l
विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवणी
उत्पादन बनविण्याची क्रिया आणि दर्जाबाबत माहिती पुढील लेखात पाहू.
संपर्कः राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७,
(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान,
विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ज्ञ आहेत.)

0 comments:
Post a Comment