राज्यातील ६८ गावांतील १५ हजार शेतकऱ्यांचा समावेश
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.२४) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ६८ गावांमधील १५ हजार ३६८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासांतच कर्जमाफीची ही यादी सरकारने जाहीर केले. लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी या कर्जमाफीविषयी समाधान व्यक्त केले.
ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा
याबाबत शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार; तसेच अन्य मान्यवरांनी वऱ्हा येथील शेतकरी बांधवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्या वेळी शेतकरी बांधवांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘सातत्याने नैसर्गिक संकटे आल्याने पिकांचे नुकसान होत होते. त्यामुळे कर्जफेड होऊ शकली नाही. मात्र, शासनाने आमची व्यथा जाणून घेतली व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणली. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. मी २०१६ मध्ये एक लाख ६० रुपये कर्ज घेतले होते. ते माफ झाल्याने मला उभारी मिळाली आहे,’’ असे वऱ्हा येथील शेतकरी सुरेशराव कोठेकर यांनी सांगितले.
‘माझे ८१ हजार ७३१ रुपयांचे कर्ज माफ झाले. योजनेची प्रक्रिया सुलभ व जलद होती. कार्यालयात चकरा माराव्या लागल्या नाहीत,’’ असे सविता प्रकाशराव गाढवे यांनी सांगितले.
‘कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुटसुटीत व सुलभ असल्याने काहीही त्रास झाला नाही. तत्काळ कर्जमुक्ती मिळाली,’’ असे शकुंतला सुकळकर यांनी सांगितले.
‘माझे २०१६ पासूनचे कर्ज या योजनेमुळे माफ झाले. आता मी नवीन कर्ज घेण्यास पात्र झालो. या योजनेमुळे मला उभारी मिळाली आहे,’’ अशी प्रतिक्रिया सुभाष रावेकर यांनी व्यक्त केली.
अमरावती येथील व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षात विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, वऱ्हा येथील तलाठी संतोषसिंह गिल आदी या वेळी उपस्थित होते.
दुसरी यादी २८ फेब्रुवारीला
ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज २ लाख रुपयांपर्यंतचे आहे, त्या शेतकऱ्यांची ही पहिली यादी आहे, अंतिम नाही. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करू. दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर होईल. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत ही योजना पूर्ण होईल. एप्रिलच्या अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
अमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहिर केल्यानंतर शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.
तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील शेतकऱ्यांनी मुख्यत्र्यांशी बोलताना कर्जमुक्ती योजनेविषयी समाधान व्यक्त केले. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र सोमवारी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.

0 comments:
Post a Comment