बटाटा पिकाची अयोग्य काढणी आणि साठवणुकीत योग्य काळजी न घेतल्याने नुकसान होण्याची शक्यता असते, त्याकरिता काढणीपूर्वी आणि काढणीनंतर साठवणुकीत काळजी घेणे आवश्यक असते.
 
बटाटा काढणीनंतर घ्यावयाची काळजी
- काढणीनंतर लगेचच बटाटे गोळा करून सावलीत ठेवावे.
 - खराब, कापलेले तसेच हिरवे बटाटे काढून टाकावे.
 - काढणीनंतर बटाट्यावर ‘पाकोळी’ या किडीचा मादी पतंग अंडी घालतो. परिणामी साठवणुकीत बटाटे खराब होतात. वेळीच नियंत्रण न झाल्यास पूर्णतः नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे काढणी केलेला बटाटा रात्रभर उघड्यावर ठेवू नये. तसेच गोळा केलेल्या बटाट्यावर लिंबाच्या पाल्याचा किंवा घाणेरीच्या पानाचा एक थर द्यावा.
 - काढलेल्या बटाट्याच्या आकारमानानुसार मोठ्या, मध्यम आणि लहान अशी प्रतवारी करून घ्यावी.
 
बटाटा साठवणुकीच्या पद्धती
- बटाटा काढणीनंतर, बाजारभाव कसा आहे? त्यानुसार साठवणूक करावी. बाजारात पाठवताना साल घट्ट असणारा व स्वच्छ बटाटा जाळीदार पोत्यात भरूनच पाठवावा.
 - बटाटा साठवणुकीसाठी अरण पद्धती आणि शीतगृह पद्धतीचा उपयोग करावा.
 
अरण पद्धती
- साठवणुकीसाठी हवेशीर आणि उंचावरील जागा निवडावी. यामध्ये साठवणुकीकरिता ३ मीटर लांब x १.५ मीटर रुंद खड्डा घेतला जातो.
 - सुरुवातीला खड्यामध्ये पाणी शिंपडून आर्द्रता नियंत्रित केली जाते.
 - खड्याचा तळ आणि बाजू ठोकून घट्ट केल्या जातात.
 - या खड्यात बटाटे ठेवून जमिनीच्यावर १ मीटरपर्यंत रास लावली जाते. त्यावर अंदाजे ३० सें. मी. वाळलेल्या गवताचा आणि कडू लिंबाच्या पाल्याचा थर देण्यात येतो.
 - खड्यातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मधूनमधून पाणी शिंपडण्यात येते. बाजारभाव अनुकूल नसल्यास आणि बटाटे २ ते ३ महिने साठवायचे असल्यास या पद्धतीचा उपयोग होतो.
 - या साठवणुकीत अवेळी पाऊस तसेच इतर ठिकाणावरून त्यात पाणी शिरणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
 
शीतगृह पद्धती
- बटाटा काढणीनंतर तो जाळीदार पोत्यात भरून नजीकच्या शीतगृहात ठेवला जातो.
 - बटाटा बियाणे म्हणून उपयोग करावयाचा असल्यास शीतगृहातील तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअस तापमान ठेवावे लागते.
 - बटाटा खाण्यासाठी उपयोगात आणायचा असेल तर १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवावा लागतो.
 
- अरण पद्धतीपेक्षा शीतगृहातील बटाटा अधिक काळ टिकतो.
 
संपर्क ः डॉ. गणेश बनसोडे, ७५८८६०५७५९
(अखिल भारतीय समन्वित बटाटा संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे) 

0 comments:
Post a Comment