यंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बटाटा पिकाची लागवड जमिनीच्या व पाण्याच्या उपलब्धते नुसार वेगवगळ्या पद्धतीने होते. त्यामुळे योग्य पद्धतीचा अवलंब करून बटाटा पिकाची काढणी करावी.
महाराष्ट्रात बटाटा पिकाची लागवड खरीप तसेच रब्बी हंगामात केली जाते. या वर्षी जून व जुलै महिन्यात झालेल्या अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे इतर भाजीपाला पिकासमवेत बटाटा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. उशिरापर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाने उघडीप न दिलाने यावर्षी रब्बी बटाटा पिकाची लागवड उशिराने झालेली आहे. त्यामुळे बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
काढणी
बटाटा पिकाच्या जाती व वापरा नुसार हे पीक ७५ ते ११० दिवसांत काढणी योग्य होते. बटाटा पिकाची पाने पिवळी पडून झाड सुकून जाईपर्यंत जमिनीत बटाटे पोसत असतात. काढणीपूर्वी पिकास १० ते १२ दिवस पाणी देणे बंद करावे त्यामुळे बटाट्याची साल घट्ट होते आणि बटाट्यास चकाकी येते. पाणी बंद केल्यावर झाडे जमिनीलगत बुंध्याजवळ विळयाच्या सहाय्याने कापून घ्यावीत. कापलेली झाडे काढणीपर्यंत त्याच ठिकाणी ठेवल्यास बटाटे हिरवे पडण्याचे प्रमाण कमी होते. महाराष्ट्रात बटाटा पिकाची लागवड जमिनीच्या व पाण्याच्या उपलब्धते नुसार वेगवगळ्या पद्धतीने होते. त्यामुळे बटाटा काढणी वेगवेगळ्या पद्धतीने होत असते.
बटाटा काढणीच्या पद्धती
१) कुदळीच्या सहाय्याने बटाटा काढणी
- ही पारंपरिक पद्धत असून, यामध्ये कुदळीच्या सहाय्याने बटाटा काढला जातो.
- कमी क्षेत्रावरील बटाटा काढणीस ही पद्धत उपयुक्त असून यामध्ये बटाट्यास इजा कमी प्रमाणात होते.
- ही पद्धत डोंगर उतारावरील बटाटा लागवड क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
२) बैलनांगराच्या सहाय्याने बटाटा काढणी
- या पद्धतीत बैलनांगराच्या सहाय्याने जमिनीतून बटाटा उकरून काढला जातो आणि मजुराकडून गोळा केला जातो.
- मध्यम क्षेत्रावरील बटाटा काढणीस ही पध्दत उपयुक्त असून यामध्ये मनुष्यबळ कमी लागते. परंतु बैलांच्या सहाय्याने शेती करण्याचे प्रमाण कमी होत असल्याने भविष्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
३) ट्रॅक्टरचलित काढणी यंत्राच्या सहाय्याने बटाटा काढणी
- अधुनीकरण आणि यांत्रिकीकरणाचा वापर अलीकडे मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बटाटा काढणीसाठी ट्रॅक्टरचलित कल्टीवेटर च्या सहायाने जमिनीतून बटाटे उकरून काढण्यात येतात आणि मजुराकडून ते एका ठिकाणी गोळा केले जातात.
- अलीकडे बटाटा काढणीसाठी पोटॅटो डिगर या यंत्राचा वापर सुद्धा करण्यात येत आहे. या डिगरच्या सहाय्याने बटाटे काढणी आणि गोणी भरणे ही कामे एकाच वेळी होत असल्याने वेळ आणि मजुरांचा खर्च वाचतो.
- मोठ्या क्षेत्रावरील बटाटा एकाच वेळी काढणीस ही पध्दत उपयुक्त आहे. परंतु या यंत्राची किंमत परवडणारी नाही, तसेच डोंगर उतारावरील आणि कमी क्षेत्रावरील बटाटा काढणीस उपयुक्त नाही.
संपर्क ः डॉ. गणेश बनसोडे, ७५८८६०५७५९
(अखिल भारतीय समन्वित बटाटा संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)

0 comments:
Post a Comment