पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत पालेभाज्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. भाजीपाला लागवडीसाठी सुधारित जातींची निवड, पाणी व खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
कोथिंबीर ः
- कोणत्याही प्रकारच्या हवामानात लागवड करता येते. उन्हाळ्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास कोथिंबिरीची वाढ कमी होते.
- मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन लागवडीस योग्य असते. हलक्या किंवा भारी जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास कोथिंबिरीची वाढ चांगली होते.
- सुधारित जाती ः लाम सी.एस.-२, ४, ६, व्ही-१, व्ही-२.
- बियाणे ः हेक्टरी ६० ते ७० किलो बियाणे.
- ३ बाय २ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यात दोन ओळींमध्ये १५ सेंमी अंतर ठेवून लागवड करावी.
- हेक्टरी ३५ ते ४० गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
- पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व २० किलो पालाश द्यावे. बी उगवून आल्यानंतर २० ते २५ दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे.
- कोथिंबिरीचा खोडवा घ्यायचा असल्यास कापणीनंतर हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे.
- पिकाला ४ ते ६ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
मेथी ः
- मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते. सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.
- पेरणीपूर्वी हेक्टरी १० ते १२ टन शेणखत जमिनीत मिसळावे.
- सुधारित जाती ः कसुरी मेथी, पुसा अर्ली बचिंग
- बियाणे ः हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे. प्रती किलो बियाणास २ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
- ३ बाय २ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यामध्ये दोन ओळींत १० सेंमी अंतर ठेवून करावी. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे.
पालक ः
- मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होते.
- सुधारित जाती ःऑलग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरीत.
- बियाणे ः हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे. प्रति किलो बियाणास २ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
- ३ बाय २ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यामध्ये दोन ओळींत १५ सेंमी अंतर ठेवून करावी.
- पेरणीपूर्वी शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी नत्र ८० किलो, स्फूरद ४० किलो, आणि पालाश ४० किलो द्यावे. संपूर्ण स्फूरद, पालाश आणि नत्राचा पहिला हप्ता पेरणीच्या वेळी द्यावा. उरलेले नत्र २ समान भागांत विभागून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी द्यावे.
- पेरणीनंतर त्वरित पाणी द्यावे. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. पिकाला नियमित पाणी द्यावे.
अळू ः
- मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.
- जाती ः कोकण हरितपर्णी किंवा स्थानिक जाती.
- बियाणे ः लागवड कंदाद्वारे केली जाते. लागवडीसाठी निरोगी कंद निवडावेत. हेक्टरी १२ ते १३ हजार कंदांची लागवड करावी.
- मशागतीवेळी शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ८० किलो पालाश द्यावे. नत्र व पालाश ही खते तीन समान हप्त्यांमध्ये लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर दीड महिन्याच्या अंतराने द्यावे. स्फुरदयुक्त खते लागवडीवेळी द्यावीत.
- लागवड ःसरी व वरंबा पद्धतीने ९० बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी.
- २० ते ३० दिवसांच्या अंतराने खुरपणी करावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे.
चुका, चाकवत व शेपू ः
- लागवडीसाठी स्थानिक जातींचा वापर केला जातो.
- सपाट वाफ्यात ३ बाय २ मीटर आकाराचे वाफे तयार करावे. प्रत्येक वाफ्यात २० सेंमी अंतरावर बी पेरावे.
- लागवडीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी नत्र ४० किलो, स्फुरद ४० किलो आणि पालाश ४० किलो द्यावे. लागवडीच्या एक महिन्यानंतर प्रति हेक्टर ४० किलो नत्र द्यावे.
संपर्क ः डॉ. बालाजी थोरात, ९१४५७७२२९३
(कृषी वनपस्तीशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

0 comments:
Post a Comment