पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२७) भुसार बाजारात ज्वारीची सुमारे ३० टन आवक झाली. सध्या राज्याच्या विविध भागासह कर्नाटकमधून ज्वारीची आवक होत आहे. ज्वारीला क्विंटलला किमान ३५०० तर कमाल ४ हजार रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० रूपये राहिला.
यंदा, लांबलेल्या पावसामुळे ज्वारीला पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले आहे. आवकदेखील वाढली आहे’’, अशी माहिती ज्वारीचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.
पुणे बाजार समितीमध्ये नगर, सोलापूर, लातूर, खानदेशातून ज्वारीची आवक होत आहे. यामध्ये मालदांडी, गावरान आणि धुरी ज्वारीचा समावेश आहे. वाणांची आवक प्रामुख्याने कर्नाटकातून होते. गेल्या वर्षी हेच दर ४ हजार ५०० रुपयांपर्यंत होते. यंदा वाढलेल्या उत्पादनामुळे दर ३५ रुपयांपर्यंत येण्याची शक्यतादेखील नहार यांनी व्यक्त केली.
नगरमध्ये २२०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक वाढली आहे. दरांत मात्र सातत्याने चढउतार होत आहे. गुरुवारी (ता. २७) ज्वारीची ६० क्विंटलची आवक झाली. तिला २२०० ते ३६०० व सरासरी २९०० रुपयांचा दर मिळाला.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत नगरसह मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यातून ज्वारीची आवक होते. यंदा ज्वारीची पेरणी अधिक असली तरी उत्पादन स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे आवकेत व दरात सतत चढउतार होत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी ३०० क्विंटलची आवक झाली आणि प्रती क्विंटल २८०० ते ३५०० व सरासरी २६५० रुपये दर मिळाला. १८ फेब्रुवारी रोजी १३० क्विंटलची आवक झाली. दर १५०० ते २७५१ रुपये व सरासरी २०२५रुपये मिळाला.
ज्वारीची ४ फेब्रुवारी रोजी ७३ क्विंटलची आवक झाली. दर २३०० ते २६०० रुपये व सरासरी २४५० रुपये मिळाला. २५ जानेवारी रोजी ३० क्विंटलची आवक होऊन २३०४ ते ४१५० रुपये व सरासरी ३२०० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.
परभणीत प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर
परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) ज्वारीची प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दराने विक्री सुरू होती, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.
सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक कमी आहे. शनिवारी (ता. २२) ज्वारीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २४०० ते ३५०० रुपये दर मिळाले. त्यापूर्वी ३१ जानेवारी रोजी २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३२०० रुपये दर मिळाले. १३ डिसेंबर रोजी ४२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २२०० ते ३३०० रुपये दर मिळाले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला पेरणी केलेल्या रब्बी ज्वारीची सुगी नुकतीच सुरु झाली आहे. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली नाही. नवा मोंढा भागातील किरकोळ व्यापारी गुरुवारी (ता. २७) ज्वारीची ३००० ते ३५०० रुपये दराने विक्री करत होते.
औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल १७०० ते २७०० रुपये दर
औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत पंधरवड्यात ज्वारीचे दर स्थिर होते. तर, आवकेत चढउतार पाहायला मिळाले. नवी ज्वारी बाजारात येणे बाकी आहे. २६ फेब्रुवारीला ११० क्विंटल आवक झालेल्या ज्वारीचे दर १७०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये १५ फेब्रुवारीला ९० क्विंटल आवक झालेल्या ज्वारीला २२०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १७ फेब्रुवारीला ११० क्विंटल आवक झाली. दर २२०० ते २८०० रुपये मिळाला. २० फेब्रुवारीला १०६ क्विंटल आवक झाली. दर १८०० ते ३००० रुपये मिळाला. २२ फेब्रुवारीला २८० क्विंटल आवक झालेल्या ज्वारीला १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
ज्वारीची २४ फेब्रुवारीला ७२ क्विंटल आवक झाली. दर १७०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २५ फेब्रुवारीला ११७ क्विंटल आवक झाली. त्या वेळी तिला १७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक २८०० रुपये
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ज्वारीची आवक चांगली राहिली. ज्वारीला उठावही तसाच मिळाला. ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २८०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ज्वारीची आवक रोज ३० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. गेल्या काही दिवसांपासून आवकेत चढ-उतार होतो आहे. पण, मागणी असल्याने दरही टिकून आहेत. ज्वारीला प्रतिक्विंटलला किमान १७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण काहीसे असेच होते. प्रतिदिन २० ते ३० क्विंटल इतकी झाली. ज्वारीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.
फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यातही आवक काहीशी अशीच प्रतिदिन १५ ते २० क्विंटल होती. तर, प्रतिक्विंटलला किमान १७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २६०० रुपये असा दर मिळाला. १०० ते २०० रुपयांच्या फरकाने चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
अकोल्यात प्रतिक्विंटलला ११५० ते ११७५ रुपये
अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थानिक ज्वारीला ११५० ते ११७५ दरम्यान दर मिळत आहे. ज्वारीचा हंगाम आटोपला आहे. आवक अत्यंत कमी होत आहे. येथील बाजारात गेल्या काही दिवसांत सरासरी १० क्विंटलच्या आतच आवक होत आहे. बाजारात कमीत कमी ११५० रुपये व जास्तीत जास्त ११७५ रुपये क्विंटलला दर भेटला.
दहा दिवसांपूर्वी ज्वारीचा सरासरी दर १३०० रुपये होता. मात्र, आता त्यात घट झाली आहे. या बाजार समितीत १७ फेब्रुवारीला ज्वारीचा कमीत कमी दर ११५० तर, जास्तीत जास्त हा १३२० रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला होता. दरांमध्ये जवळपास दीडशे रुपयांपेक्षा अधिक कमी आलेली दिसून येत आहे.
या भागातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या चिखली (जि. बुलडाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीचा दर १००० ते १९५० असा भेटला. वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे दर हे थोड्याफार अंतराने कमी-अधिक असल्याचे दिसून येते. सरासरी ११०० ते १९०० रुपयांच्या आत ज्वारीची विक्री होत आहे.
सांगलीत २५५० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल
सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. २७) ज्वारीची ७३ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५५० ते २७०० तर, सरासरी २६२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीच्या आवारात सांगली जिल्ह्यातून ज्वारीची आवक होते. बुधवारी (ता. २६) ज्वारीची १६५ क्विंटल आवक झाली. ज्वारीस प्रतिक्विंटल २५५० ते २८०० तर, सरासरी २६७५ रुपये असा दर होता. सोमवारी (ता. २४) ज्वारीची १२६ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५५० ते २८००, तर सरासरी २६७५ रुपये असा दर होता. शनिवारी (ता. २२) ज्वारीची ५५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५५० ते २८०० तर, सरासरी २६७५ रुपये असा दर होता.
गुरुवारी (ता. २०) ज्वारीची ८४ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५५० ते २८०० तर, सरासरी २६७५ रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २०) ज्वारीची ५५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५५० ते २८०० तर, सरासरी २६७५ रुपये असा दर होता.

0 comments:
Post a Comment