Monday, March 2, 2020

आरोग्यदायी आले, सुंठ पावडर

महिलांना आले आणि सुंठ पावडर परिचित आहे. ओल्या कंदास आले व वाळल्यानंतर त्यास प्रक्रिया करून सुंठ तयार होते. विविध भाज्यांमध्ये चवीसाठी वापरले जाणारे आले अप्रत्यक्षपणे आरोग्यासाठी हितकारक असते. सुंठ पावडरदेखील उत्तम आरोग्यदायी असते.

  • भूक मंदावणे, तोंडाला चव नसणे, तोंडाला पाणी सुटणे या लक्षणांमध्ये आल्याचा तुकडा चावून खावा.
     
  • सर्दी, घसादुखीमध्ये आल्याचा रस आणि मधाचे चाटण करून त्याचे २ ते ३ वेळा सेवन करावे. गरम पाणी प्यावे.
     
  • पोटात दुखत असल्यास, गॅस होऊन पोट जड झाल्यास आले आणि लिंबाचा रस मधासह घ्यावा. गरम पाण्याचे सेवन करावे.
     
  • आले पाचक म्हणून उत्तम कार्य करते. अन्नपचन होत नसल्यास, पोटदुखी जाणवल्यास आले आणि गुळाचे मिश्रण चाटवावे.
     
  • काही वेळा अजीर्ण आणि पित्ताने किंवा जास्त जेवण केल्याने अपचनाच्या उलट्या होतात. अशा वेळी योग्य औषधांसोबत पाव चमचा आले रसासोबत खडीसाखर घालून २ ते ३ वेळा सेवन करावे.
     
  • गुडघेदुखीमध्ये सुंठ पावडर फायदेशीर असते. सुंठ पावडर पाण्यात मिसळून मोठ्या चमचामध्ये गरम करावी आणि त्याचा लेप गुडघ्यावर लावावा. लेप वाळल्यानंतर गरम पाण्याने पुसून घ्यावा.
     
  • सर्दी साठून राहिल्यामुळे डोके जड होते व दुखते. अशा वेळी सुंठीचा लेप कपाळावर लावावा.

पथ्य

  • आहारात वातूळ पदार्थ, दही, थंड पदार्थांचे सेवन करू नये. जेवणाच्या वेळा पाळाव्यात.
     
  • अवेळी जेवण करणे टाळावे. शेवभाजी, फरसाण, वेफर्स यांचा अतिरेक टाळावा.

दक्षता

  • पित्तप्रकृती, उष्णता विकार, जळजळ होणे, अल्सर, मूत्र विसर्जनावेळी होणारी जळजळ अशा उष्णतेशी संबंधित तक्रारींसाठी आल्याचा उपयोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
     
  • वारंवार पोटदुखी, सांधेदुखी, मळमळ, भूक न लागणे असे त्रास सतत होत असल्यास, योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.

संपर्कः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

News Item ID: 
820-news_story-1582976700-721
Mobile Device Headline: 
आरोग्यदायी आले, सुंठ पावडर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi health benefits of Ginger
Author Type: 
External Author
डॉ. विनीता कुलकर्णी
Search Functional Tags: 
महिला, women, आरोग्य, Health, गॅस, Gas, साखर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
health, benefits, Ginger
Meta Description: 
health benefits of Ginger महिलांना आले आणि सुंठ पावडर परिचित आहे. ओल्या कंदास आले व वाळल्यानंतर त्यास प्रक्रिया करून सुंठ तयार होते. विविध भाज्यांमध्ये चवीसाठी वापरले जाणारे आले अप्रत्यक्षपणे आरोग्यासाठी हितकारक असते. सुंठ पावडरदेखील उत्तम आरोग्यदायी असते.

0 comments:

Post a Comment