उन्हाळ्यात सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी झाडांना पाणी द्यावे. दुपारी जास्त तापमानामुळे पाण्याची वाफ होते. त्या वाफेमुळे फळगळ होण्याची शक्यता असते. पाणी देताना झाडाच्या खोडासोबत पाण्याचा संपर्क होऊ देऊ नये. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
उन्हाळ्यातील प्रखर उन्हामुळे संत्रा बागेचे फार नुकसान होते. अतिउष्ण तापमानामुळे झाडे वाळण्याचे किंवा मरण्याचे प्रमाण वाढते. अचानक वाढणाऱ्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. नवीन लागवड केलेली बाग, मृग बहार घेण्यासाठीची बाग आणि आंबिया बहाराची फळे असलेली बाग असे लागवडीनुसार विभाजन केले जाते. उन्हाळ्यातील अतिउष्ण तापमानामध्ये बागांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
नवीन लागवड केलेली बाग
- प्रखर उन्हामुळे लहान झाडांची पाने करपल्यासारखी होऊन गळतात. कलमाच्या शेंड्याकडील भाग वाळायला लागतो.
- जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्यास प्रखर उन्हाच्या झोताने कलमाची साल फाटायला सुरुवात होऊन झाड मरते.
उपाययोजना
- बागेच्या दक्षिण-पश्चिम बाजूने झाडांपासून ६ मीटर अंतरावर वारारोधक झाडांची लागवड करावी. यामध्ये शेवरी, शेवगा, हेटा, निलगिरी इत्यादी झाडांची लागवड करता येते. वारारोधक झाडांमुळे उन्हाळ्यातील सोसाट्याच्या उष्ण वाऱ्यापासून लहान झाडांचे संरक्षण होते.
- प्रखर उन्हापासून कलमांच्या संरक्षणासाठी कलमाभोवती वाळलेले गवत, तुराटे, पराटे, बोरू किंवा कडब्याचा वापर करून सावली करावी. झाडाभोवती कमीत कमी १० सेंमी उंचीचे वाळलेल्या पालापाचोळ्याचे आच्छादन टाकावे.
- जमीन वखरून घ्यावी. ज्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.
- झाडांना बोर्डो पेस्ट लावावी. कलमाच्या जोडाखाली आणि वरील भागावर गवत बांधावे.
- उन्हाळ्यात झाडांना पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे खोडापासून १० सेंमी जागा सोडून सबलीने तिरकस छिद्र करून त्यात पाणी टाकावे. (छिद्र २० ते २५ सेंमी खोलीचे असावे किंवा मडका पद्धतीने पाणी द्यावे.)
मृग बहार घेण्यासाठीची बाग
- मृग बहार घेण्यासाठी उन्हाळ्यात तडण द्यावी लागते. उन्हाळ्यात तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. या काळात संत्र्याची झाडे वाढ थांबवून विश्रांती घेत असतात. विश्रांतीच्या काळातील अतिउष्ण तापमानामुळे झाडे वाळण्याचे किंवा मरण्याचे प्रमाण वाढते.
- या काळात जमिनीचा मगदूर आणि उष्णतामान यांचा योग्य समन्वय असणे आवश्यक असते. योग्य काळजी न घेतल्यास उन्हामुळे झाडाची साल वाळून तडकते आणि झाड मरते.
उपाययोजना
- मृग बहार घेण्यासाठीच्या झाडांवरील फळे २५ ते ३० मार्चपर्यंत झाडावरून पूर्णपणे काढून टाकावीत.
- फळे तोडल्यानंतर ताबडतोब बागेला पाणी न दिल्यास झाडांना ताण बसतो. याचा झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
- फळे तोडणीनंतर झाडावर येणारी सल व वाढलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. कापलेल्या भागावर होणारा बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झाडावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- जमिनीच्या प्रकारानुसार झाडाला योग्य ताण देणे आवश्यक असते. झाडांना जास्त ताण बसून झाडे मरू शकतात. हलक्या ते मध्यम जमिनीत एक महिना तर भारी जमिनीत दीड महिन्याचा ताण द्यावा.
- ताण देण्याच्या दोन ते तीन दिवसआधी झाडांना शेवटचे पाणी द्यावे. त्यानंतर उभी व आडवी वखरणी करून पाणी देणे बंद करावे.
- वखरणी केल्याने जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन थांबते. तसेच जमिनीला भेगा पडून जळावा फुटण्यापासून संरक्षण होते. जमीन भुसभुशीत राहिल्यामुळे मुळांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. तसेच, जमिनीतील कीटक उघडे पडून उन्हाच्या प्रखरतेने मरतात.
- झाडाच्या बुंध्यालगत आच्छादन म्हणून वाळलेले गवत, कडबा, पालापाचोळ्याचा १० सेंटिमीटर उंचीचा थर द्यावा. यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
- उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडाच्या बुंध्याला एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. यामुळे खोडाचे संरक्षण होते.
- पूर्ण ताण बसलेल्या झाडांची पाने चिंबतात, पिवळी पडून गळायला लागतात.
- ताणाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाडांना खते द्यावीत. शिफारशीप्रमाणे ५० किलो शेणखत, नत्राची अर्धी मात्रा (६०० ग्रॅम नत्र), स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा (४०० ग्रॅम प्रत्येकी) द्यावी.
संपर्कः डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३
(उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

0 comments:
Post a Comment