स्थानिक मागणीनुसार औषधी प्रजातींची निवड करावी. रोपवाटिकेसाठी संबंधित हवामानात येणाऱ्या प्रजातींची निवड करावी. औषधात मुळांचा वापर करण्यात येणाऱ्या वनस्पतींची सातत्याने लागवड करावी लागते.
वनौषधीची लागवड करण्यासाठी रोपे, बियाणे किंवा लागवड योग्य भागांची रोपवाटिकेमध्ये निर्मिती केली जाते. योग्य प्रजातीची निवड, बाजारातील मागणी व दराबाबत माहिती असणे गरजेचे आहे. शेतीसोबत संलग्न व्यवसाय म्हणून वनौषधीची लागवड केली जाते. वेगवेगळ्या प्रकारची रोपे एकात्मिक पद्धतीने तयार करावीत. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारची रोपे एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
रोपवाटिका स्थापनेसाठी आवश्यक बाबी
जागेची निवड
- रोपवाटिकेसाठी वनौषधींचे लागवड क्षेत्र जास्त असणाऱ्या भागाची निवड करावी. लागवड क्षेत्रापासून मध्यवर्ती ठिकाणी रोपवाटिका असावी. त्या भागात लागवड होणाऱ्या विविध प्रजातींची रोपे मागणीनुसार तयार करावीत.
जमीन
- पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
पाणी व्यवस्थापन
- रोपवाटिकेच्या ठिकाणी वर्षभर पाण्याची सोय असावी. पाण्याची टाकी व तुषार सिंचनाची सोय असावी.
कुशल मजूर
- बीजप्रक्रिया, कलम बांधणे, कंद विभाजन, पिशव्या भरणे, पाणी देणे इत्यादी कामांसाठी कुशल मजूर असावेत.
संसाधने
- चांगली पोयटा माती, वाळू, खते, बियाणे, मातृवृक्ष, मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर इत्यादी.
प्रजातीची निवड
- स्थानिक मागणीनुसार प्रजातींची निवड करावी. रोपवाटिकेसाठी त्या हवामानात येणाऱ्या प्रजातींची निवड करावी. औषधात मुळांचा वापर करण्यात येणाऱ्या वनस्पतींची लागवड सातत्याने केली जाते. हंगामी वनस्पतींची लागवडही वारंवार केली जाते.
प्रजातीनुसार रोपवाटिकेचे व्यवस्थापन
प्रजातीचे नाव | वाढीचा प्रकार | औषधी भाग | पुनरुत्पादन | आवश्यक बीजप्रक्रिया | रोपवाटिका तंत्र |
बेल | वृक्ष | फळे/पाने | बिया व कलमापासून | ताजे बी पेरावे | पिशवीतील रोपे |
अर्जुन | वृक्ष | झाडाची साल | बियांपासून | बिया २४ तास थंड पाण्यात ठेवणे | पिशवीतील रोपे |
बहावा | वृक्ष | शेंगा | बियांपासून | बिया उकळत्या पाण्यात ५ मिनिट व नंतर थंड पाण्यात बुडविणे | पिशवीतील रोपे |
हिरडा | वृक्ष | फळे | बियांपासून | बिया ३६ तास थंड पाण्यात बुडविणे आवश्यक | पिशवीतील रोपे |
अश्वगंधा | हंगामी वनस्पती | मुळे | बियांपासून | प्रति किलो बियाणांस ३ ग्रॅम डायथेन एम-४५ पावडर चोळावी. | रोपे गादी वाफ्यावर करावीत. |
काळमेघ | हंगामी वनस्पती | पंचांग | बियांपासून | प्रक्रियेची आवश्यकता नसते | पिशवीतील रोपे |
वेखंड | हंगामी वनस्पती | मुळे | कंदाद्वारे | प्रक्रियेची आवश्यकता नसते | पिशवीतील रोपे |
तुळस | हंगामी वनस्पती | पंचांग | बियांपासून | प्रक्रियेची आवश्यकता नसते | पिशवीतील रोपे |
ब्राम्ही | हंगामी वनस्पती | पंचांग/पाने | बिया व खोडांपासून | प्रक्रियेची आवश्यकता नसते | पिशवीतील रोपे |
संपर्क - डॉ. प्रसन्न सुराणा, ०२४२६ २४३२९२
(औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

0 comments:
Post a Comment