सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी युद्धासारख्या आहेत. म्हणून किमान काही खाटांच्या क्षमतेची सार्वजनिक इस्पितळे / उपचार केंद्रे / आयसीयू / विविध उपकरणे किमान प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज अवस्थेत नेहमीच हवीत.
- लष्कराला आपण कधी विचारतो का “युद्ध नाही, काही नाही, इतके रणगाडे बांधले / विकत घेतलेत ते का पडून आहेत ? किती नफा झाला ?
- हवाईदलाला आपण विचारतो का “युद्ध नाही, काही नाही, इतकी लढाऊ विमाने घेतली ती का पडून आहेत ?’ किती नफा झाला ?
- नाविक दलाला आपण विचारतो का “युद्ध नाही, काही नाही एवढ्या युद्धनौका कशाला बांधता “ किती नफा झाला ?
हे सगळं का नाही विचारत ? कारण संरक्षण सिद्धतेवरचा खर्च युद्ध व्हावे ही इच्छा मनात ठेवून केला जात नाही, तसाच युद्ध छेडले गेल्यानंतर तो करून उपयोग नसतो.
सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी युद्धासारख्या आहेत. म्हणून किमान काही खाटांच्या क्षमतेची सार्वजनिक इस्पितळे / उपचार केंद्रे / आयसीयू / विविध उपकरणे किमान प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज अवस्थेत नेहमीच हवीत. ही मागणी कोट्यवधी नागरिकांनी लावून धरायची आता गरज आहे.
आरोग्य क्षेत्रात आहे ही परिस्थिती का निर्माण झाली ? कारण आरोग्य , शिक्षण, पिण्याचे पाणी अशा पायाभूत क्षेत्रांकडे खाजगी भांडवलाने नफा कमवण्याच्या संधी म्हणून समाजाला बघायला भाग पाडले. खासगी भांडवलाचा धोरण कर्त्यांवरचा प्रभाव प्रचंड आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील इस्पितळे, संशोधन संस्था पंगू बनवण्यात आल्या; मग हळू हळू त्यांचे खासगीकरण करण्याचा मार्ग मोकळा होतो.
आरोग्य क्षेत्रात खाजगी भांडवलाचे समर्थक अडाणी आहेत; आता सगळे बिळात जाऊन बसलेत. एक जण बोलत नाहीये. पण माझ्या कोट्यवधी नागरिक भावा बहिणींनो, तुमच्या जीवन मरणाचा खेळ आहे हा. तुम्ही विचार बदललात, तर राजकारणात त्याचे प्रतिबिंब पडायला सुरुवात होईल आणि राजकीय अर्थव्यवस्था बदलेल. करोना आज ना उद्या जाणार आहे; आपल्या राजकीय नेत्यांवर व आरोग्य क्षेत्रातील कर्मींवर आपण भरवसा ठेवू या. पण करोना जे धडे शिकवत आहे ते आपण प्रामाणिकपणे आत्मसात करणार आहोत की नाही ? संपूर्ण आरोग्यक्षेत्र (आणि शिक्षण क्षेत्र वगैरे) खासगी भांडवलाच्या नफा कमावण्याच्या आग्रहाच्या जबड्यातून खेचून बाहेर काढू या ! तुमच्या धर्म/ जाती बद्दलच्या प्रेमाबद्दल मला काहीही म्हणायचे नाही; पण भांडायला आपण जिवंत तर राहायला हवे की नको ?
(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक आहेत.)

0 comments:
Post a Comment