Thursday, March 19, 2020

काळी मिरी काढणी तंत्रज्ञान

विविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला जातो. मिरीला युरोपियन देशांत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. लागवडीच्या तीन वर्षांनंतर मिरीचे उत्पादन सुरू होते. मिरीला मे ते जून महिन्यामध्ये तुरे येतात व जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढणीसाठी तयार होतात.

काढणी 

  • घोसामधील एक ते दोन मणी पिवळे किंवा नारंगी रंगाचे झाल्यानंतर त्या वेलावरील सर्व घोस काढावेत. काढलेल्या घोसातील मिरीचे दाणे वेगळे करावेत.
  • दाण्यांवर उकळत्या पाण्याची प्रक्रिया करून उन्हामध्ये वाळवावेत. सुमारे सात ते दहा दिवस दाणे उन्हात वाळवावे लागतात.
  • काळीमिरी तयार करण्यासाठी मिरी दाणे वाळवण्यापूर्वी उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवून ठेवावे.
  • यामुळे मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येऊन त्यांची प्रत सुधारते. तसेच साठवणीच्या वेळी बुरशीमुळे होणारे नुकसान टाळले जाते.

हिरवी मिरी

  • हिरवी मिरी तयार करण्यासाठी घड पूर्ण तयार होण्यापूर्वी काढावेत. हिरवी मिरीची साठवण करण्यासाठी १५ ते २० टक्के मिठाच्या द्रावणात ठेवावी. नंतर डबा अथवा बाटलीमध्ये सीलबंद करावे.

काळी मिरी तयार करणे

  • घडातील एक, दोन फळे तांबडी लाल होताच संपूर्ण घड काढणी करावी. 
  • गर्द काळा रंग येण्यासाठी मिरी फळांना गरम पाण्याची प्रक्रिया दिली जाते.
  • देठविरहित फळे बांबूच्या करंडीत, टोपलीत किंवा कापडी पिशवीत भरून उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवावीत. नंतर उन्हामध्ये वाळवावी.

पांढरी मिरी तयार करणे

  • या पद्धतीत पूर्ण पक्व झालेले (लाल/नारंगी रंगाचे) दाणे उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे उकळवले किंवा वाफवले जातात. नंतर पल्पिंग मशिनद्वारे त्यांच्यावरील साल काढली जाते. साल काढल्यानंतर दाणे ब्लिचिंग पावडरच्या द्रावणात घालावेत व नंतर वाळवावेत.
  • दाण्यांच्या उरलेल्या सालीपासून तेल काढले जाते. त्यामुळे साल वाया जात नाही.
  • मिरीच्या घडामधील जास्तीत जास्त फळे पिवळसर लाल झाल्यावर घड काढणी करावी. फळे घडापासून वेगळी केल्यावर गोणपाटामध्ये भरावीत.
  • फळे वाहत्या पाण्यामध्ये ७ ते १० दिवस बुडवून ठेवावी. त्यामुळे फळावरील साल मऊ होते. हाताने किंवा फडक्यामध्ये फळे चोळून त्यावरील साल काढवी.
  • बिया पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन ३ ते ४ दिवस उन्हामध्ये वाळवाव्या. तयार झालेली पांढरी मिरी स्वच्छ सुक्या कपडामध्ये चोळावी. त्यामुळे मिरी चकचकीत पॉलिश केल्यासारखी दिसते.

उत्पन्न

  • एका मिरीच्या वेलापासून सुमारे २ ते ३ किलो वाळलेली मिरी मिळते. लागवडीच्या तिसऱ्या वर्षीपासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होऊन हळूहळू वाढते.
  • शंभर किलो हिरव्या मिरीपासून सुमारे ३३ किलो काळी मिरी मिळते.

संपर्क - डॉ. सुमित राऊत, ९९२२७७६७७४
(डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

News Item ID: 
820-news_story-1584619124-134
Mobile Device Headline: 
काळी मिरी काढणी तंत्रज्ञान
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Black pepper harvesting technology
Author Type: 
External Author
डॉ. सुमित राऊत, संतोष पाटील, विवेक गिर
Search Functional Tags: 
उत्पन्न, baby, infant, कोकण, Konkan, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Black pepper, harvesting, technology
Meta Description: 
Black pepper harvesting technology विविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला जातो. मिरीला युरोपियन देशांत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. लागवडीच्या तीन वर्षांनंतर मिरीचे उत्पादन सुरू होते. मिरीला मे ते जून महिन्यामध्ये तुरे येतात व जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढणीसाठी तयार होतात.

0 comments:

Post a Comment