सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या स्वयंपाकाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर लाकडाचा वापर करण्यायोग्य चुली, कोळशाची शेगडी यांचा वापर झाला. यातील धुरामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी धुराड्यासह किंवा चिमणीसह चुली, रॉकेलवर चालणारे स्टोव्ह आणि आता एलपीजी वायूवर चालणारे गॅस स्टोव्ह सर्रास वापरले जातात. त्याला विद्युत शेगड्यांचीही जोड मिळाली आहे. अन्नपदार्थ शिजवण्याच्या पद्धतीमध्येही उघड्या भांड्यामध्ये शिजवण्यापासून वाफेच्या दाबामध्ये (प्रेशर कुकर) शिजवणे, विजेच्या साह्याने दाबाखाली अन्न शिजवणे असे आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. त्यात आता आणखी एका प्रकाराची भर पडली आहे, ती म्हणजे इस्टंट पॉट. साधारण ९० च्या दशकामध्ये प्रेशर कुकरचा वापर वेगाने सुरू झाला. त्यानंतर इलेक्ट्रिक प्रेशरचे पेटंट फाइल झाले. त्यानंतर तिसऱ्या पिढीतील प्रेशर कुकर म्हणजेच इन्स्टंट पॉट बाजारात आले आहेत.
काय आहे हे इन्स्टंट पॉट
हा एक इलेक्ट्रिक प्रेशर कुकरचा नवा प्रकार असून, त्यात सात प्रकारे अन्न शिजवता येते. यामध्ये दाबाखाली शिजवणे, भात शिजवणे, ब्राउनिंग, सावकाश शिजवणे या पद्धतीने अन्न शिजते. सोबतच अन्न गरम ठेवता येते. आतील उष्ण वातावरण टिकून राहत असल्याने त्याचा वापर दही किंवा योगर्ट तयार करण्यासाठीही होऊ शकतो.
- वाफवणे, भाजणे, सावकाश शिजवणे किंवा कॅनिंग या क्रिया करता येतात.
- हे स्टेनलेस स्टिलपासून बनवलेले असून, स्वच्छता सोपी होते.
- या पद्धतीमुळे स्वयंपाकाच्या वेळेमध्ये बचत होते. या इन्स्टंट पॉटमुळे पदार्थ शिजवण्यासाठी २० ते ६० मिनिटे पुरेशी होतात. सामान्यतः एखाद्या महिलेचा स्वयंपाकासाठी प्रतिदिन चार तासांपर्यंत वेळ जातो.
- यामध्ये शिजवण्यासाठी अन्न ठेवल्यानंतर अन्य कामे करण्यासाठी मोकळीक मिळते. अन्न तयार झाल्यानंतर पुढे १० तासांपर्यंत गरम राहू शकते.
शिजवण्याचा स्मार्ट प्रकार
- जेवणासाठी अन्न शिजवणे हे केवळ काही मिनिटांचे काम राहते. अगदी अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होतो. आपल्या पारंपरिक प्रेशर कुकरप्रमाणे एकाच वेळी दोन भांडी यात ठेवता येतात.
- यात चौदा बटने दिली असून, त्यानुसार चौदा प्रकारे अन्नावर प्रक्रिया करता येतात.
- १. दाबावर शिजवणे, २. सावकाश शिजवणे, ३. थोड्या तेलात तळणे, ४. वाफवणे, ५. अंडी, ६. केक, ७. दही, योगर्ट, ८. लापशी किंवा खीर, ९. मिश्रधान्य, १०. भात, ११. सूप, १२. बीन्स, १३. पोल्ट्री, १४. मांस.
- या नावीन्यपूर्ण शिजवण्याच्या तंत्रामुळे महिला, मुली किंवा पुरुषांचाही स्वयंपाकामध्ये उत्साह वाढू शकतो. विशेषतः ज्या घरामध्ये दोघेही नोकरी किंवा व्यवसायामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हे तंत्र अधिक फायदेशीर ठरणार आहे.
(लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक आहेत.)

0 comments:
Post a Comment