Monday, March 2, 2020

सोलापुरात हिरवी मिरची, घेवडा, भेंडीचे दर टिकून

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, घेवडा, भेंडीच्या दरातील तेजी पुन्हा टिकून राहिली. त्यांची आवक मात्र जेमतेम राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक अगदीच कमी राहिली. प्रतिदिन १० ते १५ क्विंटलपर्यंत ती होती, तर घेवड्याची ५ ते ७ क्विंटलपर्यंत आणि भेंडीची ४० ते ५० क्विंटलपर्यंत आवक होती. पण, मागणीच्या तुलनेत ती जेमतेम राहिली. त्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सातत्याने त्यांच्या दरांत तेजी आहे. या सप्ताहातही ती कायम होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, तर घेवड्याला किमान १००० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला. 

त्याशिवाय वांगी आणि ढोबळी मिरचीचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही तशी कमीच राहिली. प्रत्येकी ५० ते १०० क्विंटलपर्यंत रोज राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये आणि ढोबळळ्या मिरचीला किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला. 

कांद्यांच्या आवकेत घट

भाज्यामध्ये कोथिंबिरीला काहीसा उठाव मिळाला. बाकी मेथी आणि शेपूचे दर स्थिर राहिले. कोथिंबिरीची आवकही या सप्ताहात वाढली. कोथिंबिरीची आवक रोज १० हजार पेंढ्यापर्यंत राहिली. तर, मेथी आणि शेपूची आवक प्रत्येकी ५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ३०० ते ५०० रुपये, मेथी आणि शेपूला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या आवकेतही काहीशी घट झाली. रोज ६० ते ७० गाड्यांपर्यंत आवक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २३०० रुपये असा दर मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

News Item ID: 
820-news_story-1583150698-371
Mobile Device Headline: 
सोलापुरात हिरवी मिरची, घेवडा, भेंडीचे दर टिकून
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi Green pepper, ghevda, okra prices stable in Solapur
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
सोलापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, भेंडी, Okra, ढोबळी मिरची, capsicum, कोथिंबिर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Green pepper, ghevda, okra, prices, stable, Solapur
Meta Description: 
Green pepper, ghevda, okra prices stable in Solapur सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, घेवडा, भेंडीच्या दरातील तेजी पुन्हा टिकून राहिली.

0 comments:

Post a Comment