Tuesday, March 17, 2020

तांत्रिक निकषाप्रमाणे खोदा शेततळे

शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा आणि चाचणी खड्डे घेऊन खोली निश्चित करावी. शेततळे भरल्यावर अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी आउटलेटची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. असे केल्यास ते पाणी शेतात मागे पसरणार नाही.
 
शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा लांबलेल्या पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी ठिबक किंवा तुषार पद्धतीने पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. खड्डा खोदून तयार केलेले शेततळे आणि नाल्याला आडवा बांध टाकून पाणी अडवलेले शेततळे असे शेततळ्याचे दोन प्रकार आहेत.

शेततळ्यासाठी जागेची निवड

  • शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खोदावे. शेततळे किमान २.५ ते ३ मीटर खोल खोदावे. या खड्ड्याच्या आतील बाजूने प्लॅस्टिक पेपर अंथरावा. याला लायनिंग (अस्तरीकरण) असे म्हणतात. हा प्लॅस्टिक पेपर साधारण ३००-४०० मायक्रॉनचा असावा.
  • बाजूच्या भिंतींचा कोन साधारण १४० अंश च्या जवळ असणे महत्वाचे असते.
  • बाजुच्या भिंतीला १.५ः१ उतार द्यावा. त्यामुळे पावसाचे पाणी साचण्यास मदत होते आणि बाजूच्या भिंतीची माती तळ्यात घसरत नाही. यामुळे शेततळ्याची निगा राखणे सोपे होते.
  • शेततळे भरल्यावर अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी आउटलेटची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. असे केल्यास ते पाणी शेतात मागे पसरणार नाही.
  • खड्डा खोदुन झाल्यावर सर्व बाजूने पाणी मारून ठोकून घ्यावा. सर्व पृष्ठभाग समपातळीत करून घ्यावा.
  • तळात अंदाजे ६ इंच जाडीचा मऊ मातीच थर दयावा. पृष्ठभागावर खाचखळगे किंवा दगड असल्यास पाण्याचा दाब पडुन या ठिकाणी लायनिंग खराब होण्याची शक्यता असते या साठी ही काळजी घेणे आवश्यक आहे.
  • बांधापासुन तळ्याच्या सर्व बाजुने १.५ बाय १.५ बाय १.५ मी. चा चर खोदुन घ्यावा त्यात लायनिंग ची वरील बाजु गाडुन टाकता येते. याला अॅकरिंग म्हणतात. यामुळे लायनिंग ची हालचाल होत नाही व ते जास्त काळ टिकण्यास मदत होते.
  • शेततळ्याला कुंपण घालणे अत्यावश्यक आहे. कुंपण नसल्यास वन्य प्राणी तलावात शिरण्याचा व अपघात होण्याचा धोका असतो.

शेततळे बांधताना घ्यावयाची काळजी

  • शेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी.
  • शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्चित करावी.
  • चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्चित करावी.
  • शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे, ते पाणी संकलन क्षेत्र निश्चित करून त्याचे क्षेत्र मोजावे.
  • शेतातील पाण्याचा प्रवाह निश्चित करावा. एकूण प्रवाहापैकी ५० टक्के पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या शेततळ्याचे आकारमान निश्चित करावे. शेततळे शक्यातोवर चैकोनी व खोल असावे.
  • शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणी संकलन क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्चित करावी.
  • शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या तीन ते चार टक्यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः दोन हेक्टर क्षेत्राकरिता
  • २० बाय २० बाय ३ मी. (१२०० घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे.
  • शेततळे बांधताना माती शेततळ्यात वाहून येणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी दगडी किंवा फांदेरी सांडवा तयार करावा.
  • ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा.
  • शेततळे खोदत असतांना किमान १ ते १.५ मी. चा बर्म सोडून नंतर माती टाकावी.
  • आपल्या शेतामध्ये पडणा-या पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून गरजेप्रमाणे वापरता येते. तसेच परीसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होतो.

संपर्क ः डॉ. सुभाष टाले ः ९८२२७२३०२७
(माजी संचालक, कृषि पद्धती व पर्यावरण केंद्र,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) 

News Item ID: 
820-news_story-1584447346-265
Mobile Device Headline: 
तांत्रिक निकषाप्रमाणे खोदा शेततळे
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture story in marathi construction of farm pond
Author Type: 
External Author
डॉ. सुभाष टाले
Search Functional Tags: 
खड्डे, शेततळे, Farm Pond, पाणी, Water, पाऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
construction of farm pond
Meta Description: 
construction of farm pond शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा आणि चाचणी खड्डे घेऊन खोली निश्चित करावी. शेततळे भरल्यावर अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी आउटलेटची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. असे केल्यास ते पाणी शेतात मागे पसरणार नाही.

0 comments:

Post a Comment